मुस्लीम आरक्षणासाठी सह्यांची मोहिम
By Admin | Updated: September 4, 2015 22:46 IST2015-09-04T22:46:00+5:302015-09-04T22:46:00+5:30
मुस्लीम आरक्षणासाठी सह्यांची मोहिम

मुस्लीम आरक्षणासाठी सह्यांची मोहिम
म स्लीम आरक्षणासाठी सह्यांची मोहिममुंबई : मुस्लीम समाजाला शैक्षणिक आरक्षण देण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी करत समाजवादी पार्टीने सह्यांची मोहिम सुरू केली आहे. ११ सप्टेंबरपर्यंत ही मोहिम सुरू राहणार असून ५ लाख सह्या घेण्याचा निर्धार सपाने शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.सह्यांचे निवेदन सरकारला जमा केल्यानंतरही सरकार जागे झाले नाही, तर दुसर्या टप्प्यात धरणे आंदोलन करणार असल्याचे सपाने सांगितले. त्यानंतर लोकांमध्ये जनजागृती करून महाधरणे आणि उपोषणाद्वारे जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा सपाने दिला आहे.भाजप सरकार मुस्लिमांना सापत्न वागणूक देत असल्याची प्रतिमा समाजात तयार झाल्याचा आरोप सपाने केला. तरी आरक्षण लागू करून सरकारला मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याची संधी असल्याचेही सपाने स्पष्ट केले.