सीएनएक्स-नागपुरातही यावा पुणे- मुंबई फोटोग्राफी ट्रेंड

By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:00+5:302015-06-12T17:38:00+5:30

- एमबीए करूनही छायाचित्रणाला जीवन अर्पणाऱ्या हर्षल चवरेची धडपड - सीएनएक्सला सांगितले फोटोग्राफीचे अनेक पैलू

CNX-Nagpur also Yava Pune-Mumbai photography trend | सीएनएक्स-नागपुरातही यावा पुणे- मुंबई फोटोग्राफी ट्रेंड

सीएनएक्स-नागपुरातही यावा पुणे- मुंबई फोटोग्राफी ट्रेंड

-
मबीए करूनही छायाचित्रणाला जीवन अर्पणाऱ्या हर्षल चवरेची धडपड - सीएनएक्सला सांगितले फोटोग्राफीचे अनेक पैलू
उत्तम छायाचित्र काढणे ही कला आहे. ती प्रत्येकाच्या अंगी असतेच असे नाही. काहीही न बोलता मनातले भाव व्यक्त करायचे उत्तम माध्यम म्हणजे फोटोग्राफी. फोटोग्राफीला आज खूप चांगले दिवस आले आहेत. आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यामध्ये छायाचित्राचा उपयोग होत नाही. मलादेखील पूर्वीपासून छायाचित्रणाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना माझ्या अनेक छायाचित्रांना स्पर्धेत पारितोषिके मिळू लागली आणि मी फोटोग्राफीमध्ये करिअर करण्याचे ठरविले. मी एमबीए झालो. पण, फोटोग्राफीचा नाद काही सुटत नाही. आता आपल्या नागपुरात पुण्या- मुंबईसारखा ट्रेंड आणण्यासाठी माझी धडपड सुरू आहे, या शब्दात हर्षल चवरे या गुणवान छायाचित्रकाराने सीएनएक्सशी आपला प्रवास शेअर केला.

पालकांचा सपोर्ट महत्त्वाचा
आज छायाचित्रण क्षेत्रात सुगीचे दिवस आले आहेत. प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर छायाचित्रकारांची मोठी मागणी आहे. छायाचित्राशिवाय आज कोणतेच काम पूर्ण होत नाही. ही बाब लक्षात येताच हर्षल चवरे या विद्यार्थ्यांने आपले एमबीए पूर्ण केल्यावर फोटोग्राफीमध्ये विशेष शिक्षण घेण्यासाठी मंबई गाठली. हर्षल सांगतो, मात्र हे इतके सोपे नव्हते. अनेक पालकांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन काही चांगला नाही. माझाही तसाच अनुभव आहे. छायाचित्रण क्षेत्रात करिअर करणार, असे म्हटल्यावर काय तू लग्नातील फोटोग्राफीच करणार का वगैरे बाळबोध प्रश्न आजही विचारले जातात. मात्र मेट्रो शहरात जाहिरात शूट अथवा टेबल टॉप प्रॉडक्ट शूट अथवा इंडस्ट्रीयल व कार इंडस्ट्री मध्ये छायाचित्रकाराला मोठ्या संधी आहेत. तुमच्यात जर इतरांपेक्षा वेगळी दृष्टी असेल तर तुम्ही या क्षेत्रात आपल्या नावाबरोबरच मोठा पैसा देखील कमावू शकता.

जेवढे शिकाल तेवढे कमीच
कोणताच फोटोग्राफर कधीच परफेक्ट नसतो. कारण, हे असे क्षेत्र आहे ज्यात शिकण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. तुम्ही जेवढे याच्या खोलात जाल तेवढे तुम्हाला नवीन काहीतरी गवसत जाईर्ल. परंतु दुर्दैवाने या क्षेत्राची ओळख मर्यादित आहे. मात्र मोठ्या शहरात फोटोग्रार्फसला मोठ्या प्रमाणात मागणी व मान आहे. हे मी स्वत: मुंबईत फोटोग्राफी शिकताना बघितले आहे. म्हणूनच मी या क्षेत्रात आपले करिअर करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

Web Title: CNX-Nagpur also Yava Pune-Mumbai photography trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.