शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल तलाक पीडित आणि परित्यक्त्या महिलांना योगी सरकार देणार सहा हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 16:42 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्रिपल तलाक पीडित महिलांसोबतच हिंदू महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी ट्रिपल तलाक पीडित महिलांसोबतच हिंदू महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी (25 सप्टेंबर) ट्रिपल तलाक पीडित महिला आणि परित्यक्त्या यांना दरवर्षी 6000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. जो पर्यंत अशा महिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकार त्यांना आर्थिक मदत करत राहणार असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. 

एक लग्न केल्यानंतर दुसरे लग्न करणाऱ्या हिंदू पतीवर देखील कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ट्रिपल तलाक पीडित महिला आणि परित्यक्त्या महिलांसाठी विशेष योजना तयार करण्यात आली आहे. त्याच्या माध्यमातून महिलांना दरवर्षी 6000 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वर्षभरात 273 ट्रिपल तलाकची प्रकरणे समोर आली होती. या सर्व प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी आधीच्या सरकारवर देखील यावेळी टीका केली आहे. समाजातील कोणत्याही घटकातील व्यक्तीने स्वतः ला दुःखी समजू नये. त्यांच्यासाठी सरकार अनेक चांगल्या योजना राबवणार आहे. स्वातंत्र्यानंतर या सर्व समस्यांचे निराकरण करणे गरजेचे होते. परंतु, अद्याप ते करण्यात आले नाही, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

योगी सरकारने राज्यातील 17 अन्य मागासवर्गीय जातींचा (ओबीसी) अनुसूचित जातींमध्ये (एससी) समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला अलाहबाद हायकोर्टाने  काही दिवसांपूर्वी स्थगिती दिली आहे. योगी सरकारने 24 जूनला अध्यादेश जारी केला होता. यात 17 अन्य मागासवर्गीय जातींचा (ओबीसी) अनुसूचित जातींमध्ये (एससी) समावेश करण्यात आला होता. यावेळी सामाजिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. मात्र, याविरोधात अलाहबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशtriple talaqतिहेरी तलाक