शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बजरंगबलीवर अतूट श्रद्धा, आचारसंहितेचं उल्लंघन नाहीच, योगींनी लिहिलं निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 15:02 IST

योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. ज्यामध्ये आयोगाला सांगताना त्यांनी केलेल्या विधानाचं समर्थन केलेलं आहे. बसपा प्रमुख मायावती यांच्या भाषणानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे विधान केलं. 

लखनऊ – केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या प्रचारात भाषणादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर 72 तास प्रचारबंदीचे आदेश दिले आहेत. हे आदेश आज पहाटे 6 वाजल्यापासून लागू झालेत. मात्र योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. ज्यामध्ये आयोगाला सांगताना त्यांनी केलेल्या विधानाचं समर्थन केलेलं आहे. बसपा प्रमुख मायावती यांच्या भाषणानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे विधान केलं. 

योगी आदित्यनाथ यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला 11 एप्रिलला पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी सांगितले की, 9 एप्रिल रोजी मेरठमध्ये मी केलेल्या भाषणावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्याचे कळाले. मात्र या विषयाची सुरुवात विरोधी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केली होती. आचारसंहितेचं उल्लंघन करत एका पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षाने मुसलमानांना त्यांच्या पार्टीला समर्थन करण्यासाठी मतदान करावं असं आवाहन केलं होतं. त्यासाठी देशाचा जबाबदार नागरिक म्हणून माझं कर्तव्य होतं की मी अशा लोकांचा पर्दाफाश करायला हवा. 

बजरंगबलीवर माझी अटूट श्रद्धा – योगीकेंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात योगी आदित्यनाथ यांनी बजरंगबलीवरुन केलेल्या विधानाचं समर्थन केलेलं आहे. योगी यांनी पत्रात नमूद केलं आहे की, बजरंगबलीवर माझी अतूट श्रद्धा आहे. जर कोणाला भिती वाटत असेल तर त्यासाठी मी माझी श्रद्धा सोडू शकत नाही. 

मायावती यांनी 7 एप्रिल रोजी सहानपूर येथे भाषण केलं होतं. सपा-बसपा-रालोद यांच्या संयुक्त सभेत मायावती यांनी मुस्लिमांनी मतदान करताना आवाहन केलं होतं. त्यानंतर 9 एप्रिलच्या योगी आदित्यनाथ यांच्या सहानपूरजवळील मेरठच्या सभेत जर सपा-बसपाला अलीवर विश्वास असेल तर मला पण बजरंगबलीवर विश्वास आहे. इतकचं नाही तर सपा-बसपाच्या व्यासपीठावर हे लोक अली अली ओरडत असतात. हा हिरवा रंगाचा व्हायरस देशात पसरत आहे. मात्र यूपी या व्हायरसच्या कचाट्यात सापडणार नाही असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. 

भाजपा शिष्टमंडळ निवडणूक आयोगासमोर मांडणार बाजू उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आणलेल्या ७२ तास प्रचार बंदीवरुन केंद्रीय निवडणूक आयोगासमोर भाजपा आपलं म्हणणं मांडणार आहे. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नकवी आणि जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmayawatiमायावतीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीyogi adityanathयोगी आदित्यनाथsaharanpur-pcसहारनपुरUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग