लखनऊ: आपल्या पशूप्रेमामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका अजब आदेशामुळे चर्चेत आले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या गंगा यात्रेदरम्यान त्यांच्या मार्गात गाय, बैल येऊ नये, याची जबाबदारी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडे देण्यात आली. उद्या आदित्यनाथ गंगा यात्रेसाठी मिर्झापूरमध्ये येणार आहेत. गंगा यात्रेदरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या मार्गात गाय, बैल येऊ नयेत, याची जबाबदारी ९ अभियंत्यांवर सोपवण्यात आली. मात्र यावर बरीच टीका झाली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा आदेश तडकाफडकी मागे घेतला. सोमवारी हा आदेश जारी करण्यात आला होता. 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या यात्रेदरम्यान मिर्झापूर ते बिरोही दरम्यान ९ अभियंत्यांची ड्युटी लावण्यात आलेली आहे. या अभियंत्यांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या ठिकाणी हजर राहावं,' असं आदेशात नमूद करण्यात आलं होतं.
मुख्यमंत्र्यांच्या मार्गात येणारे गाय-बैल पकडा; नऊ अभियत्यांवर विचित्र जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 22:58 IST