शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

Yogi Adityanath: योगींनी जाहीर केला लोकसंख्या नियंत्रणाचा अ‍ॅक्शन प्लॅन; म्हणाले 'विकासात बाधा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 13:33 IST

Population policy of Uttar Pradesh: लोकसंख्या नीतिचा संबंध प्रत्येक नागरिकाशी जोडलेला आहे. वाढती लोकसंख्या ही गरीबीचे कारण आहे. दोन मुलांमध्येही योग्य अंतर असायला हवे, असे योगी म्हणाले.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी राज्यात नवी लोकसंख्या नीति (Population Control Policy) ची घोषणा केली आहे. लखनऊमध्ये (Lucknow) एका कार्यक्रमात योगी यांनी नवीन नीति जाहीर केली. यावेळी त्यांनी सांगितले की, वाढती लोकसंख्या विकासात बाढा ठरते. लोकसंख्या नियंत्रणासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. (Increasing population can be a hurdle in way of development. Every community has been taken care of in Population Policy 2021-2030: Chief Minister Yogi Adityanath)

योगी यांनी सांगितले की, या बाबत जागरुकतेची भूमिका खूप महत्वाची आहे. लोकसंख्या नीतिचा संबंध प्रत्येक नागरिकाशी जोडलेला आहे. वाढती लोकसंख्या ही गरीबीचे कारण आहे. दोन मुलांमध्येही योग्य अंतर असायला हवे. जर त्यांच्यामध्ये योग्य अंतर नसेल तर त्यांचे पोषणही चांगले होत नाही. त्यावरही परिणाम होतो. गरीबी आणि वाढती लोकसंख्या या एकमेकांशी संबंधित आहेत. 

योगी यांनी सांगितले की, समाजाच्या विविध घटकांना लक्षात घेवून सरकारने लोकसंख्या निय़ंत्रण नीति लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा संबंध केवळ लोकसंख्या स्थिरीकरणाशीच नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सुख आणि समृद्धीचा रस्ता आणणे हा देखील आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रयत्नांची गरज आहे. आम्ही वाढत्या लोकसंख्येवरून लोकांना जागरुक करणार आहोत. शाळा आणि अन्य ठिकाणांवर लोकांमध्ये जागृती केली जाणार आहे. 

काय आहे नीति? 2021 ते 2030 च्या प्रस्तावित नीतिद्वारे कुटुंब नियोजन कार्यक्रमाद्वारे गर्भ निरोधक उपायांची सविधा वाढविली जाणार आहे. तसेच सुरक्षित गर्भपाताची यंत्रणा उभारण्यात येईल. नवजात मृत्यू दर, माता मृत्यू दर कमी करण्यासाठी; नपुंसकता, वांझपणाच्या समस्या दूर करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या नीतिद्वारे 11 ते 19 वर्षांच्या युवकांना पोषण, शिक्षण आणि आरोग्य सुविधा देण्यासोबतच वयोवृद्धांच्या देखभालीसाठी व्यापक व्य़वस्था करणेदेखील यामध्ये आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश