शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन, दिल्लीच्या एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 13:41 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. जेव्हा ही माहिती देण्यात आली तेव्हा ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या टीम-11 सोबत बैठक करत होते.

ठळक मुद्देआनंद सिंह बिष्त यांनी सोमवारी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतलाआनद सिंह यांना किडनी आणि लिव्हरचा होता त्रासआनद सिंह हे फॉरेस्ट रेंजर पदावरून झाले होते निवृत्त

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्त यांचे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांनी सोमवारी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. जेव्हा ही माहिती देण्यात आली तेव्हा ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या टीम-11 सोबत महत्वाची बैठक करत होते. मात्र, निरोप मिळाल्यानंतरही ते विचलीत झाले नाही आणि त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. मात्र यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.

किडनी आणि लिव्हरचा होता त्रास -आनंद सिंह बिष्त यांना किडनी आणि लिव्हरचा त्रस होता. प्रकृती खालावल्याने त्यांना 13 मार्चरोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. येथील डॉक्टर विनीत आहूजा यांचा चमू त्यांच्यावर उपचार करत होता.

फॉरेस्ट रेंजर पदावरून झाले होते निवृत्त -आनंद सिंह हे उत्तराखंडमधील यमकेश्वरच्या पंचूर गावात राहत होते. ते येथेच फॉरेस्ट रेंजर पदावरून 1991 साली निवृत्त झाले होते. तेव्हापासूनच ते आपल्या गावी राहत होते.

योगी घर सोडून गोरखपूरला निघून गेले होते -योगी आदित्यनाथ हे लहानपणीच आपले घर सोडून गोरखपूरला महंत अवेद्यनाथ यांच्याकडे गेले होते. यानंतर योगी आदित्यनाथ हे अवेद्यनाथ यांच्या जागी महंत झाले. निवडणुकीनिमित्त गावी गेल्यानंतर त्यांचे कुटुंबीय त्यांना भेटत असतात.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्लीhospitalहॉस्पिटल