शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

CM योगी आदित्यनाथांची कारवाई; उत्तर प्रदेशात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 22:44 IST

योगी सरकारने हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. राज्यातील काही कंपन्या हलाल सर्टिफिकेशनच्या नावावर डेअरी प्रोडक्ट, कापड, साखर, स्नॅक्स, मसाले आणि साबण इत्यादी उत्पादनांची विक्री करत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. ही बाब मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली आहे.

बेकायदेशीरपणे 'हलाल सर्टिफिकेट' देण्याच्या काळ्या धंद्यावर उत्तर प्रदेशात बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर शनिवारी बंदीचा आदेशही जारी करण्यात आला. आदेशानुसार, हलाल प्रमाणपत्रासह खाद्यपदार्थांचे उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्रीवर तत्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली आहे. याप्रकरणी दोषी आढळल्यास, संबंधित व्यक्ती/कंपनीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. 

दुग्धजन्य पदार्थ, साखर, बेकरी उत्पादने, पेपरमिंट ऑइल, तयार पेये आणि खाद्यतेल यांसारख्या उत्पादनांच्या लेबलवर हलाल प्रमाणपत्राचा उल्लेख असल्याची माहिती अलीकडेच राज्य सरकारला मिळाली होती. एवढंच नाही तर काही औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि कॉस्मेटिक उत्पादनांच्या पॅकिंग/वलेबलिंगवरही हलाल प्रमाणपत्र चिन्हांकित केल्याचे समोर आले. औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित उत्पादनांच्या लेबलवर हलाल प्रमाणपत्र चिन्हांकित करण्याची तरतूद नाही.

कोणत्याही औषध, वैद्यकीय उपकरण किंवा कॉस्मेटिकच्या लेबलवर हलाल प्रमाणपत्राशी संबंधित बाब छापणे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. या संदर्भात गेल्या शुक्रवारी लखनौ आयुक्तालयात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. एफआयआरनुसार, हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई, जमियत उलेमा हिंद हलाल ट्रस्ट दिल्ली, हलाल कौन्सिल ऑफ इंडिया मुंबई, जमियत उलेमा महाराष्ट्र मुंबई इत्यादींनी विशिष्ट धर्माच्या ग्राहकांना त्यांची विक्री वाढवण्यासाठी धर्माच्या नावाखाली बेकायदेशीर हलाल प्रमाणपत्रे दिली.

हलाल प्रमाणपत्र म्हणजे काय?इस्लामिक धर्मशास्त्रात ज्या गोष्टींना हराम घोषित करण्यात आले आहे, त्या गोष्टी निषिद्ध आहेत, तर ज्या गोष्टी हलाल घोषित केल्या आहेत त्या करण्याची परवानगी आहे. इस्लामिक विश्वासांनुसार, हलाल अन्नपदार्थांच्या उत्पादन प्रक्रियेत आणि प्राण्यांच्या कत्तलीला लागू होते. हलाल प्रमाणित म्हणजे विशिष्ट उत्पादन इस्लामिक विश्वासांनुसार तयार केले गेले आहे. अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर 'हलाल प्रमाणित' असा शिक्का लावतात.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथMuslimमुस्लीमHinduहिंदू