शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

तिढा सुटला : अनुभव, जनाधार असलेले सीएम अन् संकटमोचक डीसीएम; तळागाळातील व्यापक पाठिंब्याचा मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 07:34 IST

उपमुख्यमंत्रिपद दलित समाजातील आमदाराला दिले नाही तर पक्षाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वर यांनी गुरुवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला आहे. 

नवी दिल्ली : सरकार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आणि राज्यभरातील तळागाळातील व्यापक पाठिंबा यामुळे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदासाठीची खडतर लढत जिंकण्यास मदत झाली. त्यामुळे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.

...तर अवघड जाईलउपमुख्यमंत्रिपद दलित समाजातील आमदाराला दिले नाही तर पक्षाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वर यांनी गुरुवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला आहे. 

सिद्धरामय्या यांची खासीयत काय?- १२ ऑगस्ट १९४८ रोजी गरीब शेतकरी कुटुंबात जन्म.- म्हैसूर विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी मिळविणारे त्यांच्या कुटुंबातील ते पहिले सदस्य. त्यांनी काही काळ वकील म्हणून प्रॅक्टिस केली.- २०१३ ते २०१८ दरम्यान मुख्यमंत्री म्हणून काम - कर्नाटकातील सर्वांत दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत आणि पुढील लोकसभा निवडणुकीत जास्तीतजास्त जागा जिंकण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी- प्रचारात तसेच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रे’त त्यांची जनतेमध्ये लोकप्रियता दिसून आली. - काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते देवराज उर्स यांच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे सिद्धरामय्या हे कर्नाटकचे एकमेव मुख्यमंत्री आहेत.- नऊ वेळा आमदार. जनता दल (धर्मनिरपेक्ष) सोडून २००६ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.- सिद्धरामय्या यांनी ‘अहिंदा’ रॅली घेतल्या. ही एक सामाजिक-राजकीय संकल्पना आहे, जी मागासवर्गीय आणि दलितांचे प्रतिनिधित्व करते.- २००८ मध्ये प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणूनही केली होती नियुक्ती.

ईडीने अनेक छापे टाकले तरी ‘खडका’सारखे कठोर राहिले, काेण आहेत डी. के. शिवकुमार? -ते काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात, परंतु जेव्हा मुख्यमंत्रिपदाची संधी आली तेव्हा ते स्वत:साठी संकटमोचक ठरू शकले नाहीत. त्यामुळे सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदी बसणार आहेत आणि शिवकुमार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.

- १५ मे १९६२ रोजी कर्नाटकातील कनकापुरा येथे जन्म. १९८० च्या दशकात विद्यार्थी नेता म्हणून राजकीय कारकीर्द सुरू. हळूहळू काँग्रेस पक्षात त्यांचा उदय झाला.- आठ वेळा आमदार.  १९८९ मध्ये सथानूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा ते फक्त २७ वर्षांचे होते.- महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात असताना आणि अहमद पटेल गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक लढवत होते तेव्हा आपले आमदार एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवकुमार यांच्यावर विश्वास ठेवला. दोन्ही वेळा त्यांनी काँग्रेस आमदार  रिसॉर्टमध्ये ठेवले होते. शिवकुमार यांचे समर्थक त्यांना ‘कनकपुरा बंदे’ (खडक) म्हणतात. - सप्टेंबर २०१८ मध्ये  ईडीने शिवकुमार यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर आयकर आणि ईडीने छापे टाकण्याची मालिका सुरू झाली आणि त्यांच्यावर अनेक खटले दाखल केले गेले. मात्र ते न डगमगता लढत राहिले.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसGovernmentसरकार