शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

नव्या संसदेसाठी हजारो कोटी रुपये, मग लसीकरणाला पैसै नाहीत का? ममतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 21:33 IST

आता जर मंत्री येत असतील, तर त्यांनाही विशेष उड्डाणांसाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट आणावा लागेल. सर्वांसाठी नियम समानच असायला हवेत.

कोलकाता - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची धुरा हाती घेतली आहे. यानंतर आता त्यांनी थेट केंद्राच्या कोरोना नीतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्राकडे कोरोनासंदर्भात कुठल्याही प्रकारची पारदर्शक नीती नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिली आहे. यात, त्यांनी अधिक चांगले धोरण तयार करावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे, असे ममता म्हणाल्या. याच बरोबर, भाजपच्या लोकांनी बंगालमध्ये येऊन कोरोना पसरवला, असा आरोप करत, अद्याप राज्याला पुरेशा लशी मिळालेल्या नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. (CM Mamta banerjee says corona Virus increased in bengal due to repeated visits of bjp leaders) 

ममता म्हणाल्या, भाजप नेते राज्यात फिरत आहेत. येथील जनतेला भडकावत आहेत. नव्या सरकारला अद्याप 24 तासही झालेले नाहीत आणि ते पत्र पाठवत आहेत, टीम आणि नेते येत आहेत. ममता म्हणाल्या, ते खरोखरच जनादेश स्वीकारायला तयार नाहीत. मी त्यांना लोकांचा जनदेश स्वीकारण्याची विनंती करते.

ममता म्हणाल्या, एक टीम आली होती, त्यांनी चहा पिला आणि ते परत निघून गेले. सध्या कोरोना परिस्थिती आहे. आता जर मंत्री येत असतील, तर त्यांनाही विशेष उड्डाणांसाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट आणावा लागेल. सर्वांसाठी नियम समानच असायला हवेत. एवढेच नाही, तर भाजप नेते नेहमी-नेहमी येथे येत असल्याने राज्यात कोरोना वाढत आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.  लसीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना ममता म्हणाल्या, मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी अद्याप आपल्याला कसल्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही. ते 20,000 कोटी रुपये खर्च करून नवी संसद आणि पुतळे तयार करत आहेत. मात्र, लशीसाठी 30,000 कोटी रुपयांची व्यवस्था करू शकत नाहीत. 

याच वेळी ममतांनी पीएम केअर फडावरही भाष्य केले. पीएम केअर फंड कुठे आहे? ते तरुण वर्गाचा जीव का धोक्यात टाकत आहेत? त्यांच्या नेत्यांनी इकडे-तिकडे जाण्याऐवजी कोरोना रुग्णालयांचा दौरा करायला हवा, असे ममता म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसwest bengalपश्चिम बंगाल