शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'केंद्रात अडाणी लोकांची जमात बसलीय...", अर्थसंकल्प रोखल्याच्या मुद्द्यावरुन CM केजरीवाल संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 18:58 IST

दिल्लीचा अर्थसंकल्प सादर करण्यापासून रोखण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

नवी दिल्ली-

दिल्लीचा अर्थसंकल्प सादर करण्यापासून रोखण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "आज दिल्लीच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर होऊ शकला नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान लिहित होते तेव्हा त्यांनी याचा विचारही केला नसेल की केंद्र सरकार अशाप्रकारे राज्य सरकारला रोखू शकेल. देशाच्या संविधानावरच हल्ला केला जात आहे", असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. 

नियामानुसार राज्यपाल फक्त शिक्कामोर्तब करण्याचं काम करत असतात ते काही आक्षेप किंवा स्वत:चं निरीक्षण देऊ शकत नाहीत. राज्यपाल जर अशाप्रकारे फाइलवर शेरा देत असतील तर ते संविधानाच्या विरोधात आहे, असंही केजरीवाल म्हणाले. 

अहंकारानं केंद्र सरकारनं बजेट रोखलंकेजरीवाल म्हणाले की, अर्थसंकल्प रोखणं यात फक्त केंद्र सरकार आणि राज्यपालांचा अहंकार होता. याशिवाय दुसरं कोणतंच कारण यामागे नव्हतं. आम्ही त्याच्यासमोर झुकावं एवढंच त्याचं म्हणणं आहे. पण आम्ही जनतेच्या भल्यासाठी तुमच्यासमोर झुकण्यासही तयार आहोत, असं केजरीवाल म्हणाले. 

केंद्रात अडाणी लोकांची जमातकेजरीवाल यांनी संतापाच्या भरात केंद्रातील नेत्यांचा अडाणी असा उल्लेख केला. "तुम्ही जरा शिकलेल्या लोकांना तिथं बसवा. ज्यांच्यात बजेटचा अर्थ समजून घेण्याची क्षमता असेल. भाजपाकडे अडाणी लोकांचा साठा आहे. यांच्याकडे अडाणी लोकांची एक जमात आहे ज्यांना व्यवस्थित बजेट वाचता देखील येत नाही", असं केजरीवाल म्हणाले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी