शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

"धमक्यांना घाबरणारा नाही, जिथं कार्यक्रम असेल तिथं तिरंगा ध्वज फडकवणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 8:42 PM

jai ram thakur : ऑडिओमध्ये शेतकऱ्यांना 15 ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर रॅली काढून राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना तिरंगा फडकवण्यापासून रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिमला : दहशतवादी संघटनेद्वारे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी तिरंगा ध्वज न फडकवण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, धमक्यांना घाबरणार नाही, ज्याठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम असेल, त्याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री जयराम ठाकूर मंडी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, यावेळी येथील एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, याविषयी मला पूर्णपणे माहिती नाही, परंतु जर कोणी 15 ऑगस्टच्या दिवशी तिरंगा ध्वज न फडकवण्याची धमकी देणारा ऑडिओ मेसेज व्हायरल केला असेल तर तपास यंत्रणांशी चर्चा करून मेसेज पाठविणार्‍याचा शोध घेतला जाईल. तसेच, चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग -21 वर खालिस्तानी संघटनांचे झेंडे बाह्य राज्यातून जाणाऱ्या वाहनांवरही लावण्यात आल्याप्रकरणी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी चिंता व्यक्ती केली. अशी प्रकरणे गांभीर्याने घेत मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सखोल चौकशीचे आदेशही दिले आहेत.

व्हायरल ऑडिओ मेसेजमुळे सुरक्षा यंत्रणांची उडाली झोप मिळालेल्या माहितीनुसार, बंदी घातलेल्या दहशतवादी शीख संघटनेच्या ऑडिओ मेसेजद्वारे व्हायरल होत असलेल्या धमकी मेसेजबद्दल माहिती राज्यातील पत्रकारांना मिळाली. यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या गंभीरतेमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. ऑडिओमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे शीख फॉर जस्टिसचे प्रमुख नेता गुरपतवंत सिंह पन्नू आणि इतर नेत्यांकडून मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना 15 ऑगस्टला राज्यात तिरंगा ध्वज न फडकवण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

एक मोठा मेळावा घेऊन आधीच पंजाबचा एक भाग असलेल्या हिमाचलला पंजाबमध्ये समाविष्ट केला जाईल, असे या ऑडिओ मेसेजमध्ये म्हटले आहे. तसेच, ऑडिओमध्ये शेतकऱ्यांना 15 ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर रॅली काढून राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना तिरंगा फडकवण्यापासून रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या ऑडिओ मेसेजमुळे हिमाचल प्रदेशमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश