CM Devendra Fadnavis News: आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विनोद पाटील यांनी लाल किल्ल्यात आयोजित केली होती. या सोहळ्याला आम्ही सगळे आलो होतो. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. उत्तर प्रदेश सरकारने यात चांगले सहकार्य केले. दरवर्षी या ठिकाणी जयंती साजरी करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांना जिथे कैद केले होते, त्या जागेचे अधिग्रहण सुरू करण्यात आले आहे. तिथे एक चांगल्या प्रकारचे स्मारक व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. राज्यातील गड-किल्ल्यांवरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी दुर्गतीर्थ किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन केल्यानंतर सायंकाळी थेट आग्रा येथे जाऊन लाल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. आग्रा येथील लाल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा निर्धार बोलून दाखवला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, चातुर्य यांचे स्मरण करतो
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अटकपासून कटकपर्यंत आपल्याला आपले स्वराज्य पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आग्र्याचे महत्त्व मोठे आहे. म्हणूनच आम्ही आग्रा येथे येतो आणि कार्यक्रमात सहभागी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, चातुर्य यांचे स्मरण आम्ही करतो, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक साकारले जाईल
उत्तर प्रदेश सरकारने जागा निश्चित केली असून, लवकरच त्याचे अधिग्रहण केले जाईल. लवकरच त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक साकारले जाईल. आम्हाला आनंद वाटतो की, नवीन भारतात मुघलांच्या नावावर नाही तर महाराष्ट्राचे पूजनीय दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात येते. यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे अभिनंदन करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच ज्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केले होते. त्या ठिकाणाहून शिवाजी महाराज यांनी स्वत:ची गनिमीकाव्याने सुटका करून घेतली. तेथे लवकरच शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यात येईल आणि सन २०३० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आग्रा किल्ल्यावर येतील. त्यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, लाल किल्ला ही आमची स्वाभिमानाची भूमी आहे. महाराष्ट्रात छत्रपतींचे जल दुर्ग नसते तर हिंदवी स्वराज्य बनले नसते. आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करणे हे विशेष आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशात शिकवला केला पाहिजे, Ncert ने मुगलांचा इतिहासाला १७ पाने दिली होती. मात्र, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजा यांच्यासाठी केवळ एक पॅराग्राफ दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला २० पाने मिळाली आहेत, असे फडणवीस यांनी यावेळी एका सभेला संबोधित करताना सांगितले.
Web Summary : CM Fadnavis announced a Shivaji Maharaj memorial at Agra Fort. Land acquisition is underway. PM Modi will celebrate Shiv Jayanti there in 2030. The Uttar Pradesh government is cooperating.
Web Summary : सीएम फडणवीस ने आगरा किले में शिवाजी महाराज के स्मारक की घोषणा की। भूमि अधिग्रहण जारी है। पीएम मोदी 2030 में वहां शिव जयंती मनाएंगे। उत्तर प्रदेश सरकार सहयोग कर रही है।