शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

यमुनेच्या पाण्यासंदर्भात CM आतिशी यांनी केली होती तक्रार, EC नं थेट हरियाणाकडून मागवला अहवाल! नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 18:36 IST

...यानंतर, निवडणूक आयोगानेही मुख्यमंत्री आतिशी यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.

Delhi Assembly Election 2025: सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून राजकारण तापताना दिसत आहे. नेते मंडळींचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता विधानसभा निवडणुकीचा हा रणसंग्राम यमुनेच्या पाण्यावर येऊन ठेपला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून हरियाणातील भाजप सरकारने यमुनेचे पाणी प्रदूषित केल्याचा आरोप केला होता. यानंतर, निवडणूक आयोगानेही मुख्यमंत्री आतिशी यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.

यासंदर्भात, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, "दिल्ली आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून एक निवेदन प्राप्त झाले आहे. यात, हरियाणामधून दिल्लीला मिळणाऱ्या पाण्यात अमोनियाचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयोगाने हरियाणा सरकारला उद्या (२८ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत या संदर्भात तथ्यात्मक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

सीएम आतिशी यांनी केला होता आरोप - खरेतर, आम आदमी पक्षाने भाजपवर दिल्लीतील पाणीपुरवठ्यात अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी दावा केला की, हरियाणातील भाजप सरकार जाणूनबुजून कारखान्यांचे प्रदूषण यमुनेत टाकत आहे. यामुळे यमुनेत अमोनियाचे प्रमाण वाढले आहे. तसेच, दिल्लीतील तीन मोठे प्रक्रिया प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचेही आतिशी यांनी म्हेटले आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

हरियाणा सरकार वर केजरीवालांचा आरोप -सीएम आतिशी यांच्याशिवाय माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही हरियाणा सरकारवर आरोप केला होता. ते म्हणाले होते, "यमुनेचे पाणी हरियाणातून दिल्लीत येते. तेथील भाजप सरकारने यात विष मिसळले. दिल्ली जल बोर्ड सावध होते, जर ते सावध नसते तर अनेकांचा जीव जाऊ शकला असता. हे अराजकता निर्माण करण्यासाठी केले गेले. निवडणूक आयोगाने यात हस्तक्षेप करायला हवा."

काय म्हणाले हरियाणाचे मुख्यमंत्री -यानंतर, आम आदमी पक्षाच्या आरोपांवर हरियाणा सरकारची प्रतिक्रियाही आली आहे. यासंदर्भात बोलताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले, आरोप करून पळून जाणे, ही अरविंद केजरीवाल यांची सवय आहे. केजरीवाल यांनी यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांना हे शक्य झाले नही. मी क्वालिटी चेक करण्यासंदर्भात बोललो होतो. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Atishiआतिशीdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग