शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

२०२४ मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल सामना होणार?; दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 23:01 IST

आम्ही प्रामाणिक लोक आहे, आम्ही भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. आम्ही देशभक्त आहोत. आप हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर आता तो एक विचारधारा आहे : अरविंद केंजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (AAP) विजयाचे रहस्य उघड केले. कट्टर प्रामाणिकपणा, कट्टर देशभक्ती आणि मानवता हे आपल्या पक्षाच्या विजयाचे मुख्य मंत्र असल्याचे केजरीवाल म्हणाले. गेल्या ७५ वर्षांच्या राजकीय संस्कृतीने त्रस्त झालेल्या लोकांनी आपोहूनच 'आप'ला निवडल्याचं त्यांनी सांगितलं.

"पाच वर्ष तुम्ही लुटा, पाच वर्ष आम्ही लुटतो या कल्चरमुळे पंजाबमधील लोक त्रस्त होते. ७५ वर्षांच्या राजकीय संस्कृतीनं त्रस्त असलेल्या लोकांनीच आपला विजय मिळवून दिला आहे. दिल्लीतील सात वर्षांच्या शासनकाळात लोकांना आप ही किती निराळा पक्ष आहे हे समजलं आहे," असंही केजरीवाल म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "पंजाबमध्ये आम्ही लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरलो आहोत. तिकडे आमच्या विजयाची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्या ठिकाणचे लोक राजकीय पक्षांपासून नाराज होते आणि दुसरं म्हणजे ते दिल्लीत काम करण्याच्या मॉडेलपासून प्रभावीत होते," असंही त्यांनी नमूद केलं.

आम्ही प्रामाणिक"आम्ही प्रामाणिक लोक आहे, आम्ही भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. आम्ही देशभक्त आहोत. आप हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर आता तो एक विचारधारा आहे," असं केजरीवाल म्हणाले. आम्ही दोन राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं आहे. अन्य राज्यांवरही आपलं लक्ष केंद्रित असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नावरही भाष्य केलं. "काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीसाठी भाजप जबाबदार आहे. जेव्हा काश्मीर खोऱ्यात मोठ्याप्रमाणात नरसंहार झाला, तेव्हा भाजपच्या पाठिंब्यानं केंद्रात सरकार होतं. त्यामुळे त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधानांचा सामना करणार का?जसा २०१४ मध्ये केला होता तसा २०२४ च्या निवडणुकीत केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करतील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. "तो काळ वेगळा होता. २०२४ मध्ये आम्ही मोदींशी सामना करण्यास उत्सुक आहोत," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा