CoronaVirus News : दिल्लीत कोरोनाची चौथी लाट, अद्याप लॉकडाऊनचा विचार नाही - अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 06:48 PM2021-04-02T18:48:35+5:302021-04-02T18:49:16+5:30

Arvind Kejriwal : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

cm arvind kejriwal said fourth wave of corona in delhi not considering lockdown yet | CoronaVirus News : दिल्लीत कोरोनाची चौथी लाट, अद्याप लॉकडाऊनचा विचार नाही - अरविंद केजरीवाल

CoronaVirus News : दिल्लीत कोरोनाची चौथी लाट, अद्याप लॉकडाऊनचा विचार नाही - अरविंद केजरीवाल

Next
ठळक मुद्देभविष्यात लॉकडाऊन आवश्यक असल्यास चर्चा केली जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी आपल्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीतनंतर दिल्लीत लॉकडाऊन केले जाणार नाही, असे संकेत अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. कोरोनाची देशातील दुसरी लाट असू शकते, पण दिल्लीसाठी कोरोनाची चौथी लाट आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. (cm arvind kejriwal said fourth wave of corona in delhi not considering lockdown yet)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काही पावले उचलली पाहिजेत, ती उचलली जात आहेत. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत, परंतु यावेळी पूर्वीच्या प्रकरणांपेक्षा ही कोरोनाची प्रकरणे कमी गंभीर आहेत. मृत्यू कमी होत आहेत आणि आयसीयूमध्येही रुग्णांना कमी दाखल केले जाते. आज जवळपास 50 टक्के रुग्ण रुग्णालयात जात आहेत. होम आयसोलेशनमध्ये लोक चांगले उपचार घेत आहेत. सरकार कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन करण्याचा विचार करत नाही. भविष्यात लॉकडाऊन आवश्यक असल्यास चर्चा केली जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

आज झालेल्या बैठकीत रुग्णालयांमध्ये किती व्यवस्था आवश्यक आहे. रुग्णवाहिका, रुग्णालये, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि आयसीयू यावर चर्चा केली. संपूर्ण योजना तयार आहे. खाजगी व सरकारी रुग्णालयात बेड कधी वाढवल्या जातील. कोरोनाचा प्रसार होण्यापासून कसा रोखावा. चाचण्या, ट्रेसिंग आणि आयसोलेशन वेगाने केले जात आहे. कंटेनमेंट झोन तयार करुन रोगाचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून 45 वर्षांच्या पुढील लोकांना लस घेण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कम्युनिटी सेंटर, शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करू शकतो. त्याबाबत योग्य ती व्यवस्था करेल. जिथे आपण ही लस द्याल तिथे रूग्णवाहिका, प्रथमोपचाराची व्यवस्था केली जाईल. आता 4 महिने झाले आहेत, फारसा त्रास होत नाही. केंद्र सरकार याकडे लक्ष देईल, केंद्र सरकार राज्य सरकारांना त्यांच्या स्तरावर लसीकरण करण्यास परवानगी देईल, अशी आशा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.

Web Title: cm arvind kejriwal said fourth wave of corona in delhi not considering lockdown yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.