सकाळी ढगाळ वातावरण दुपारी चटके
By Admin | Updated: January 19, 2016 00:38 IST2016-01-19T00:38:20+5:302016-01-19T00:38:20+5:30
जळगाव : वातावरणातील बदलामुळे सलग तिसर्या दिवशी सकाळी ढगाळ वातावरण होते. पावसाची शक्यता लक्षात घेत व्यावसायिकांनी खबरदारीची भूमिका घेतली होती.

सकाळी ढगाळ वातावरण दुपारी चटके
ज गाव : वातावरणातील बदलामुळे सलग तिसर्या दिवशी सकाळी ढगाळ वातावरण होते. पावसाची शक्यता लक्षात घेत व्यावसायिकांनी खबरदारीची भूमिका घेतली होती. सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा होता. ११ वाजेनंतर उन पडायला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी काही वेळ उन्हाचे चटके जाणवत होते. त्यानंतर पुन्हा दुपारी चार वाजेपासून ढगाळ वातावरण झाले. वातावरणातील अचानक झालेल्या या बदलामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयात रुग्णांची तपासणीसाठी गर्दी होत आहे.सकाळीच ढगाळ वातावरण असल्याने कृषि उत्पन्न बाजार समितीतील आडत व्यावसायिकांनी धान्य झाकून ठेवले होते. तर उघडण्यावर असलेल्या धान्याच्या गोणी हमालांमार्फत दुकानात ठेवण्यात येत होत्या. वातावरणात निर्माण झालेल्या या गारव्यामुळे गहू व हरबरा पिकाला काही प्रमाणात लाभ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र ढगाळ वातावरणानंतर अवकाळी पाऊस झाल्यास रब्बी हंगामाला फटका बसण्याची शक्यता आहे. येत्या आठवडाभरात कमाल व किमान तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.