शहरात ढगाळ वातावरण

By Admin | Updated: February 29, 2016 00:07 IST2016-02-29T00:07:32+5:302016-02-29T00:07:32+5:30

जळगाव: शहरात रविवारी संध्याकाळी ढगाळ वातावरण व गारवा निर्माण झाला होता. विदर्भात गारपीट व रावेर तालुक्यात संध्याकाळी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने त्याचा परिणाम शहरातही जाणवत होता. रात्री नऊ वाजेनंतर गार वारा सुटला होता. हवामान खात्यानेही येत्या दोन दिवसात जिल्‘ात पावसाची शक्यता वर्तविली आहे. रात्री उशिरा तुरळक पावसाचे थेंब पडत होते. कडक उन व उकाड्यामुळे हैराण झालेल्या जळगावकरांना गार वातावरणामुळे दिलासा मिळाला. दरम्यान, बहिणाबाई महोत्सव व लग्न समारंभात टाकण्यात आलेले मंडपाचे नुकसान होवू नये यासाठी आयोजकांकडून खबरदारीपर उपाययोजना केल्या जात होत्या.

Cloudy atmosphere in the city | शहरात ढगाळ वातावरण

शहरात ढगाळ वातावरण

गाव: शहरात रविवारी संध्याकाळी ढगाळ वातावरण व गारवा निर्माण झाला होता. विदर्भात गारपीट व रावेर तालुक्यात संध्याकाळी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने त्याचा परिणाम शहरातही जाणवत होता. रात्री नऊ वाजेनंतर गार वारा सुटला होता. हवामान खात्यानेही येत्या दोन दिवसात जिल्‘ात पावसाची शक्यता वर्तविली आहे. रात्री उशिरा तुरळक पावसाचे थेंब पडत होते. कडक उन व उकाड्यामुळे हैराण झालेल्या जळगावकरांना गार वातावरणामुळे दिलासा मिळाला. दरम्यान, बहिणाबाई महोत्सव व लग्न समारंभात टाकण्यात आलेले मंडपाचे नुकसान होवू नये यासाठी आयोजकांकडून खबरदारीपर उपाययोजना केल्या जात होत्या.

Web Title: Cloudy atmosphere in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.