टाकाऊ वस्तूंपासून साकारलेल्या कलाकृती प्रदर्शनाचा समारोप
By Admin | Updated: November 15, 2015 23:14 IST2015-11-15T23:14:35+5:302015-11-15T23:14:35+5:30
अकोला : टाकाऊ वस्तूंपासून साकारलेल्या आकर्षक कलाकृतींच्या दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी उत्साहात समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

टाकाऊ वस्तूंपासून साकारलेल्या कलाकृती प्रदर्शनाचा समारोप
अ ोला : टाकाऊ वस्तूंपासून साकारलेल्या आकर्षक कलाकृतींच्या दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी उत्साहात समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.आयएमए सभागृहात आयोजित दोन दिवसीय प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमाला माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांनी भेट दिली. दरम्यान, कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी साकार केलेले कला प्रदर्शन कल्पकतेचा उत्कृष्ट आविष्कार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जेईई, फाईन आर्ट शाखेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनाला आमदार गोवर्धन शर्मा, नगरसेवक गोपी ठाकरे तसेच समाजातील कलाप्रेमींनी भेट दिली. प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमाला नीरज आवंडेकर, कलाध्यापक संघाचे विभागीय कार्यवाहक सुभाष धार्मिक, विलास अनासने आदींची प्रमुख उपस्थिती होती. समारोपीय कार्यक्रमात गत वर्षीच्या नाटा शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये हिमानी अग्रवाल, रूचिका सुरेका, विधी जोशी, ध्वनी भाटिया, राधिका संघानिया, कृष्णा वर्मा, दिव्या पांडे,पूजा पाटील, जूई बिजवे, यशराज कनोजिया, महक आनंदानी, शामक वैद्य, सचिन लालवाणी, अक्षय बालचंदाणी, हितेश चावला, साक्षी डोडेजा, शाश्वती यावलकर, खुशबू सेठ, निखिल पाटणी, मुद्दसर खान, अर्पिता जोशी, मानसी पारवाल, सुहानी बनसोड, आकांक्षा गोयनका, यश अलकरी, सिद्धेश खंडाळे, आनंद गावंडे आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रवी मुळे यांनी मानले.