शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'बाबासाहेबांसमोर डोळे बंद करून प्रायश्चित पण करा, कारण...'; केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राहुल गांधींना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:25 IST

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे. 

Breaking news: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचा उल्लेख करत काँग्रेसला लक्ष्य केले. महू दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना डिवचलं. 'भाजपने उभारलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट द्या आणि डोळे बंद करून प्रायश्चितही करा', अशा शब्दात चौहान यांनी गांधी आणि खरगेंना डिवचलं. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, "मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी हे आज महू दौऱ्यावर येत आहेत. महूमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जन्मस्थळी उभारलेले भव्य स्मारक जरूर बघा, जे भाजप सरकारने बनवले आहे."

चौहान म्हणाले, डोळे मिटून प्रायश्चित पण करा केंद्रीय कृषिमंत्री पुढे म्हणाले की, "त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर डोळे बंद करून प्रायश्चित पण जरूर करावे, कारण तुम्ही आणि तुमच्या पक्षाने नेहमी बाबासाहेबांचा अपमान केला आहे. स्वातंत्र्यानंतर मध्य प्रदेशात अनेक दशके काँग्रेसचे सरकार होते, पण काँग्रेसने त्यांच्या जन्मस्थळी ना कोणताही कार्यक्रम आयोजित केला, ना कोणतेही स्मारक उभारण्याची कल्पना मांडली", अशी टीका शिवराज सिंह चौहान यांनी गांधी आणि खरगेंवर केली.

सत्तेत आल्यावर काँग्रेसने स्मारकाचे काम बंद केले -चौहान

"मध्य प्रदेशात जेव्हा भाजपचे सरकार आले, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री स्व.सुंदर लाल पटवाजींनी महूमध्ये स्मारकाचे भूमिपूजन केले. त्यानंतर काँग्रेस सरकार आले आणि काम बंद केले. पुन्हा भाजपचे सरकार आले आणि मी मुख्यमंत्री बनलो, तेव्हा आम्ही बाबासाहेबांच्या सन्मानार्थ भव्य दिव्य स्मारक उभारले", असे म्हणत चौहान यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. 

"मध्य प्रदेशात आता आंबेडकर महाकुंभाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये बाबासाहेबांचे हजारो अनुयायी येतात. त्यांच्या राहण्याची आणि जेवणासह इतर सर्व व्यवस्था भाजप सरकार करते", असा टोलाही शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसला लगावला. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान