शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गिर्यारोहकांनी शोधले 50 वर्षांपूर्वी विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 12:16 IST

50 वर्षांपूर्वी झालेल्या एका भीषण विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह गिर्यारोहकांनी शोधून काढले आहेत.

उत्तरकाशी - 50 वर्षांपूर्वी झालेल्या एका भीषण विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह गिर्यारोहकांनी शोधून काढले आहेत. 1968 साली हिमाचल प्रदेशमधील लाहोल येथील पर्वतरांगांमध्ये भारतीय हवाई दलाचे एएन-12 हे विमान अपघातग्रस्त झाले होते. चंदीगड येथून लेह येथे जात असलेल्या या विमानातून सुमारे 102 जण प्रवास करत होते. दरम्यान, या परिसरात गिर्यारोहण करण्यासाठी आलेल्या गिर्यारोहकांनी या अपघातग्रस्त विमानाचे काही अवशेष आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे मृतदेह शोधून काढले. 

 गिर्यारोहकांचे एक पथक 1 जुलै रोजी चंद्रभागा-13 या शिखरावर स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी गेले होते. या अभियानादरम्यान ढाका ग्लेशियरच्या बेस कॅम्पजवळ समुद्रसपाटीपासून सुमारे  सहा हजार 200 मीटर उंचीवर  हे अवशेष सापडले. आम्हाला सुरुवातीला अपघातग्रस्त विमानाचे काही तुकडे सापडले. त्यानंतर अधिक शोध घेतला असता काही मीटर अंतरावर एका जवानाचा मृतदेह सापडला, अशी माहिती या पथकाचे प्रमुख राजीव रावत यांनी सांगितले.  "आमच्या पथकाने येथे आढळलेले विमानाचे तुकडे आणि मृतदेहांची छायाचित्रे घेऊन त्याची माहिती 16 जुलै रोजी लष्कराच्या  हाय ऑल्डिट्युट वॉर स्कूलला दिली. त्यानंतर या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे." असेही रावत यांनी पुढे सांगितले. एएन-12 या विमानाला 7 फेब्रुवारी 1968 रोजी अपघात झाला होता. हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. चंदीगडहून लेह येथे निघालेले हे विमान प्रतिकूल हवामानामुळे वैमानिकाने लेहजवळून माघारी फिरवले होते. मात्र 98 प्रवासी आणि 4 चालक दलाचे सदस्य असलेले है विमान 7 फेब्रुवारी 1968 पासून बेपत्ता झाले होते.  

टॅग्स :airplaneविमानairforceहवाईदलHimachal Pradeshहिमाचल प्रदेशAccidentअपघात