खंडाळा बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:52+5:302015-08-08T00:23:52+5:30
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोगद्याजवळ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली. मागील आठवड्यात याच ठिकाणी दरड कोसळल्यानंतर खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगदा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे आज कोणतीही दुर्घटना घडली नाही, अथवा वाहतुकीवरही परिणाम झाला नाही.

खंडाळा बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली
ल णावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोगद्याजवळ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली. मागील आठवड्यात याच ठिकाणी दरड कोसळल्यानंतर खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगदा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे आज कोणतीही दुर्घटना घडली नाही, अथवा वाहतुकीवरही परिणाम झाला नाही.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जून महिन्यापासून दरडी कोसळत आहेत. दोन महिन्यांत ४ वेळा या मार्गावर दरड कोसळल्याने मार्गातील घाट परिसर वाहतुकीसाठी धोकादायक वाटू लागला आहे. मागील दोन दिवसांपासून द्रुतगती महामार्ग दुपारी १२ ते सायंकाळी ४ दरम्यान बंद ठेवण्यात आला होता. शुक्रवारी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता. मात्र पहाटेच ही घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक सुरू न करता राष्ट्रीय महामार्गावरूनच वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. दरम्यान, द्रुतगती महामार्गावरील घाटातील वाहतूक बंद असल्याने शुक्रवारीही लोणावळा शहरात वाहतूककोंडी कायम होती.