सफाई कामगारांनाही मिळणार बँकेतून कर्ज

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30

सोलापूर: महापालिकेतील सफाई कामगारांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी किमान २५ हजार रुपयांची अट होती. ती शिथिल झाल्याने आणि महापालिकेने कर्जदारांना हमीपत्र देण्याचा हिरवा कंदील दिल्याने आता त्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.

Cleansing workers get loan from bank | सफाई कामगारांनाही मिळणार बँकेतून कर्ज

सफाई कामगारांनाही मिळणार बँकेतून कर्ज

लापूर: महापालिकेतील सफाई कामगारांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी किमान २५ हजार रुपयांची अट होती. ती शिथिल झाल्याने आणि महापालिकेने कर्जदारांना हमीपत्र देण्याचा हिरवा कंदील दिल्याने आता त्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.
यापूर्वी मनपाच्या सफाई कामगारांना मुला-मुलींच्या शिक्षण, विवाह, गृहकर्जासाठी महापालिकेकडून हमीपत्र दिले जात नसल्यामुळे बँकांकडून कर्ज देण्यासाठी नकारघंटा दिली जायची. ही अडचण समजताच आ. प्रणिती शिंदे यांनी शनिवारी बँक ऑफ इंडियाचे लीड मॅनेजर पत्की व बँक ऑफ महाराष्ट्रचे बडीवाले, लेंडवे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यात चर्चेद्वारे सोलापूर महापालिकेतील सफाई कामगारांना कर्जासाठी २५ हजार रुपये वेतनाची अट शिथिल करण्यात आली. यामुळे सफाई कामगारांना बँकेतून कर्ज प्रकरणे करणे सोयीचे झाले आहे. तसेच बँकेतून कर्ज घेण्यासाठी संबंधित सफाई कामगारांना महापालिकेकडून हवे असलेले हमीपत्र देण्याचा निर्णयही महापौर सुशीलाताई आबुटे यांनी जाहीर केला. जनहितासाठी यापुढील काळातही आवश्यक ते निर्णय व पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस महापौर आबुटे यांच्यासह पक्षनेते संजय हेमगड्डी, मनपा अधिकारी जोगदनकर, मोहिते, कुलकर्णी, मादगी मेहतर समाज संस्थेचे अध्यक्ष तिपण्णा सुकोलू, तिरुपती बोनसे, दशरथ अडाकूल उपस्थित होते.

Web Title: Cleansing workers get loan from bank