ॅगांधीसागर तलाव परिसरात साफसफाई

By Admin | Updated: July 4, 2015 00:06 IST2015-07-04T00:06:01+5:302015-07-04T00:06:01+5:30

Cleanliness in Gangesagar Lake area | ॅगांधीसागर तलाव परिसरात साफसफाई

ॅगांधीसागर तलाव परिसरात साफसफाई

>
नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने लोक प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून शहरातील तलावांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी गांधीसागर तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
महापौर प्रवीण दटके व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. गांधीबाग व धंतोली झोनमधील कर्मचारी व अधिकारी यात सहभागी झाले होते.
माजी नगरसेवक मनोज साबळे,प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, धंतोली झोनचे उपअभियंता अनिल कडू, बाजार अधीक्षक डी.ए.उमरेडकर, नंदकिशोर भोवते, संजय गोरे, राजेश गायधनी, सदाशिव भेंडे, मोहन गुडधे यांच्यासह झोन कर्मचाऱ्यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)

Web Title: Cleanliness in Gangesagar Lake area