विठ्ठलवाडीत स्वच्छता मोहीम

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:39+5:302015-02-14T23:51:39+5:30

तळेगाव ढमढेरे : येथील बीट अंतर्गत ३७ अंगणवाड्यांतील सेविका-मदतनिसांनी विठ्ठलवाडी गावात स्वच्छता मोहीम राबविली.

Cleanliness campaign in Vitthalwadi | विठ्ठलवाडीत स्वच्छता मोहीम

विठ्ठलवाडीत स्वच्छता मोहीम

ेगाव ढमढेरे : येथील बीट अंतर्गत ३७ अंगणवाड्यांतील सेविका-मदतनिसांनी विठ्ठलवाडी गावात स्वच्छता मोहीम राबविली.
एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी बीट तळेगाव ढमढेरे व ग्रामपंचायत विठ्ठलवाडी अंतर्गत स्वच्छता करण्यात आली. तंटामुक्तीचे अध्यक्ष किसन गवारे व ग्रामपंचायत सदस्य सुदाम गवारे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी ग्रामसेविका स्वाती सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबाजी गवारे, रवींद्र गवारे, संदीप गवारे, दिलीप गवारे, अंगणवाडी पर्यवेक्षिका शोभा सिन्नरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी तळेगाव ढमढेरे बीटमधील विठ्ठलवाडी, कासारी, तळेगाव ढमढेरे, टाकळी भीमा, बुरुंजवाडी, कोंढापुरी, निमगाव म्हाळुंगी या ७ गावांतील ३७ अंगणवाडी सेविका-मदतनीस या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. तसेच, महिला बचत गटाच्या महिलाही सहभागी झाल्या होत्या. विठ्ठलवाडी गावठाण व स्मशानभूमी परिसर व रस्ता या महिलांनी स्वच्छ केला.
फोटोओळी : अंगणवाडी सेविका व महिला बचत गटाच्या महिला विठ्ठलवाडी परिसराची स्वच्छता करताना.

Web Title: Cleanliness campaign in Vitthalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.