शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
"काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
9
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
10
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
11
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी उघड; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना केली अटक
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
13
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
14
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
15
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
16
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
17
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
18
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
19
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
20
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार

Coronavirus: मोबाईल वापरता? मग कोरोनापासून जरा जास्तच सावध राहा; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 2:28 PM

Coronavirus मोबाईलच्या स्क्रीनवर आठवडाभर जिवंत राहतो कोरोनाचा विषाणू

ठळक मुद्देस्मार्टफोनच्या स्क्रीनवर सात दिवस जिवंत राहू शकतो कोरोना व्हायरसस्मार्टफोन वापरुन झाल्यावर चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याचा सल्लास्मार्टफोनची स्क्रीन अल्कोहोल वाईप्सनं पुसल्यास टळू शकतो धोका

सध्या जगभरात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत ३ हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. भारतात २५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांना कोरोना विषाणूचा धोका असल्याचं इंग्लंडमधल्या साऊथप्टन विद्यापीठातले प्राध्यापक विल्यिम कीविल यांनी सांगितलं. स्मार्टफोनचा वापर केल्यावर चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी हात व्यवस्थित धुवा. कारण स्मार्टफोनच्या स्क्रीनवरही कोरोना विषाणू असू शकतो, अशी माहिती कीविल यांनी दिली. निर्जीव पृष्ठभागावर कोरोना विषाणू जवळपास एक आठवडाभर जिवंत राहू शकतो. मानवी शरीरातून शिंक किंवा कफच्या रुपात तो बाहेर येतो. कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते, असं त्यांनी सांगितलं. स्टील आणि तांब्याच्या पृष्ठभागावर कोरोनाचा विषाणू २ तासांपर्यंत जिवंत राहतो, अशी माहिती अमेरिकेतल्या आजार नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (सीडीसी) देण्यात आली आहे. कार्डबोर्ड आणि प्लास्टिकवर हा विषाणू बराच काळ तग धरतो. मानवी शरीराच्या बाहेर ९ दिवस कोरोनाचा विषाणू जिवंत राहू शकतो. अल्कोहोल वाईप्सनं स्मार्टफोनची स्क्रीन स्वच्छ केल्यास कोरोनाचा विषाणू मरतो. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरनं हात धुवावेत, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांनी दिला आहे. जगातल्या बहुतांश देशांमध्ये कोरोना विषाणूची दहशत पाहायला मिळते आहे. आतापर्यंत ९२ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ३ हजार ११० जणांचा मृत्यू झाला आहे. यातले २९०० हून अधिक जण चीनमधले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना