स्वच्छ पाणी म्हणजे उत्तम आरोग्य आणि आर्थिक विकास - पंतप्रधान

By Admin | Updated: April 24, 2016 15:33 IST2016-04-24T12:00:03+5:302016-04-24T15:33:36+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात' कार्यक्रमामधून देशवासियांशी संवाद साधताना दुष्काळ आणि शिक्षण या विषयांवर भाष्य केले.

Clean water means better health and economic development - PM | स्वच्छ पाणी म्हणजे उत्तम आरोग्य आणि आर्थिक विकास - पंतप्रधान

स्वच्छ पाणी म्हणजे उत्तम आरोग्य आणि आर्थिक विकास - पंतप्रधान

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २४ - अपु-या पावसामुळे देशातील अनेक भाग भीषण दुष्काळी संकटाचा सामना करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात'  कार्यक्रमामधून देशवासियांशी संवाद साधताना दुष्काळ आणि शिक्षण या विषयांवर भाष्य केले.  
 
गावांमध्ये पाण्याचे संवर्धन आणि साठवण करणे आवश्यक आहे. आपण यासाठी अभियान सुरु केले पाहिजे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर पाण्याचा दर्जाही सुधारेल आणि स्वच्छ पाणी म्हणजे उत्तम आरोग्य आणि आर्थिक विकास असल्याचे मोदींनी सांगितले. 
 
आपल्या भाषणात मोदींनी महाराष्ट्रातील अहमदनगरमधील एका गावाचा उल्लेख केला. या गावातील लोकांनी पिकांचा पॅटर्न बदलला, कमी पाणी घेणा-या  पिकांची शेती  या गावातील लोकांनी सुरु केली असे त्यांनी सांगितले. 
 
यावर्षी चांगला पाऊस होणार ही आनंदाची बातमी आहे पण त्याबरोबर आव्हानही आहे. जास्तीत जास्त पिकांचे उत्पादन कसे घ्यायचे याचा आपण विचार केला पाहिजे. मन की बात मध्ये त्यांनी गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची ही माहिती दिली. 
 

Web Title: Clean water means better health and economic development - PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.