वैयक्तिक शौचालयांचे उद्दीष्ट पूर्णत्वाकडे स्वच्छ महाराष्ट्र अभियान : कामकाजावर नियंत्रणासाठी व्हॉटस्ॲप ग्रुप

By Admin | Updated: December 10, 2015 23:57 IST2015-12-10T23:57:39+5:302015-12-10T23:57:39+5:30

जळगाव : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हगणदरीमुक्तीसाठी वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट पूर्णत्वाकडे असून २१२२ शौचालय बांधकामाचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर ६ शौचालयांचे बांधकामही पूर्ण झाले आहे.

Clean Maharashtra Campaign with the goal of individual toilets: The Whootspeep Group to control the work | वैयक्तिक शौचालयांचे उद्दीष्ट पूर्णत्वाकडे स्वच्छ महाराष्ट्र अभियान : कामकाजावर नियंत्रणासाठी व्हॉटस्ॲप ग्रुप

वैयक्तिक शौचालयांचे उद्दीष्ट पूर्णत्वाकडे स्वच्छ महाराष्ट्र अभियान : कामकाजावर नियंत्रणासाठी व्हॉटस्ॲप ग्रुप

गाव : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हगणदरीमुक्तीसाठी वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट पूर्णत्वाकडे असून २१२२ शौचालय बांधकामाचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर ६ शौचालयांचे बांधकामही पूर्ण झाले आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय नसलेल्या व हगणदरीत विधी उरकणार्‍या नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालयासाठी १२ हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी मनपाकडे आतापर्यंत २हजार १२२ अर्ज प्राप्त झाले असून ते सर्व मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी ५८७ अर्जदारांना ६ हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे ३५ लाख २२ हजार रुपयांचे अनुदान वाटपही झाले असून २२१ शौचालयांचे बांधकाम सुरूदेखील झाले आहे. त्यापैकी ६ शौचालयांचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी दिली.
----- इन्फो----
व्हॉटस्ॲप ग्रुपवरून नियंत्रण
मनपाअंतर्गत या अभियानाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व शाखा अभियंते, आरोग्यनिरीक्षक, प्रभाग अधिकारी, आरोग्याधिकारी व आयुक्त यांचा एक व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यावर प्रत्येक जण दररोज आपल्याकडील कामाची माहिती या ग्रुपवर द ेत आहे. आयुक्तही दररोज माहिती घेऊन सूचनाही देत आहेत.

Web Title: Clean Maharashtra Campaign with the goal of individual toilets: The Whootspeep Group to control the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.