शास्त्रीय गायिका वसुंधरा कोमकली यांचे निधन

By Admin | Updated: July 31, 2015 01:46 IST2015-07-31T01:46:11+5:302015-07-31T01:46:11+5:30

पंडित कुमार गंधर्व यांच्या पत्नी शास्त्रीय गायिका वसुंधरा कोमकली यांचे येथे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.

Classical singer Vasundhara Komkali dies | शास्त्रीय गायिका वसुंधरा कोमकली यांचे निधन

शास्त्रीय गायिका वसुंधरा कोमकली यांचे निधन

देवास (मध्य प्रदेश) : पंडित कुमार गंधर्व यांच्या पत्नी शास्त्रीय गायिका वसुंधरा कोमकली यांचे येथे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे कन्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली आणि मोठा चाहता वर्ग आहे. देवास येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वसुंधरा कोमकली या पद्मश्रीसह विविध पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. १९६२ मध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित कुमार गंधर्व यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. कुमार गंधर्व यांच्या संगीत प्रवासात त्यांनी मोलाची साथ दिली. पंडितजींच्या गीत वर्षा, गीत हेमंत, वसंत, त्रिवेणी यासारख्या कार्यक्रमात त्या सोबत करीत. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Classical singer Vasundhara Komkali dies