तांबापुरात दोन गटात हाणामारी
By Admin | Updated: May 16, 2016 00:44 IST2016-05-16T00:44:29+5:302016-05-16T00:44:29+5:30
जळगाव : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तांबापुरात दोन गटात एकमेकांत भिडल्याची घटना १४ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून ८ जणांविरुद्ध हाणामारीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तांबापुरात दोन गटात हाणामारी
व रचक्र कॉलनी अंधारात : अनेकांचे कूलर बंद पडले नागपूर : काटोल मार्गावरील वीरचक्र कॉलनी येथील स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या (एसएनडीएल) फिडर पिलरमध्ये शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. यामुळे हा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. स्थानिक लोकांनी लगेच घटनेची एसएनडीएलला माहिती दिली. त्यावर एसएनडीएलच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून फिडर पिलरला लागलेली आग विझविली; शिवाय पथकाने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु रात्री १ वाजतापर्यंत त्यांना कोणतेही यश मिळाले नाही. शेवटी एसएनडीएलने रात्री २ वाजताच्या सुमारास दुसऱ्या फिडरवरून या परिसरात वीजपुरवठा सुरू केला. मात्र एकाच फिडरवर अधिक भार वाढल्याने रात्रभर विजेचा लपंडाव चालला. विशेष म्हणजे, सध्या नागपुरातील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. अशास्थितीत मागील तीन दिवसांपासून येथे सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय विजेचा पॉवर कमी-जास्त होत असल्याने अनेकांचे कूलर बंद पडले असून, काहींच्या कूलरच्या मोटरसुद्धा जळाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. माहिती सूत्रानुसार, एसएनडीएलने शनिवारी दिवसभर येथील फिडर दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न निरर्थक ठरले आहेत. त्यामुळे रविवारीसुद्धा या परिसरातील नागरिकांना विजेच्या समस्येचा सामना करावा लागला. ........