शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
2
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
3
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
4
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
6
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
7
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
8
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
9
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
10
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
11
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
12
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
13
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
14
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
15
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
16
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
17
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
18
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
19
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
20
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; हिंसाचारात एक ठार, अनेक जखमी; जमाव पांगवण्यासाठी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 06:42 IST

मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात ‘झोमी’ आणि ‘हमार’ जमातींच्या लोकांमध्ये झालेल्या ताज्या संघर्षात अनेक लोक जखमी झाले आहेत.

इंफाळ : मणिपूरच्या चुराचांदपूरमध्ये सोमवारी दोन वांशिक गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर उफाळलेल्या कुकी-झो-बहुल जिल्ह्यात नव्याने हिंसाचार उसळल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा एका ५३ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. 

मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात ‘झोमी’ आणि ‘हमार’ जमातींच्या लोकांमध्ये झालेल्या ताज्या संघर्षात अनेक लोक जखमी झाले आहेत. येथील दोन्ही समुदायांच्या प्रमुख संघटनांमध्ये शांतता करार झाला असताना मंगळवारी रात्री उशिरा चुराचंदपूर शहरात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. 

शहरातील काही लोकांच्या गटाने ‘झोमी’ या अतिरेकी गटाचा ध्वज काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा नवीन संघर्ष सुरू झाला. जमावाने परिसरात तोडफोड केली आणि काही लोकांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर गोळीबारही केला.

बंद मागे घेण्याचे आवाहन ‘हमार इनपुई’ आणि ‘झोमी कौन्सिल’ यांनी मंगळवारी ‘बंद’ मागे घेण्याचा आणि जिल्ह्यातील सामान्य जीवन विस्कळीत करणाऱ्या सर्व घटनांचा अंत करण्यासंदर्भात करार केला होता. ‘हमार इनपुई’चे सरचिटणीस रिचर्ड हमार यांच्यावर रविवारी ‘झोमी’ समुदायाच्या सदस्यांनी हल्ला केला, ज्यामुळे दोन्ही समुदायांमध्ये हिंसाचार झाला आणि दुसऱ्या दिवशी कर्फ्यू लागू करण्यात आला.  

सुरक्षा दलांनी शहरात काढला ‘फ्लॅग मार्च’ ‘झोमी’ आणि ‘हमार’ समुदायांमधील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याने सुरक्षा दलांनी शहरात ‘फ्लॅग मार्च’ काढला आणि लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. या घटनेला प्रतिसाद म्हणून, झोमी विद्यार्थी संघटनेने जिल्ह्यात ‘बंद’ची हाक दिली.

जिल्हा प्रशासनाने सहकार्याचे आवाहनअधिकाऱ्याने सांगितले की, लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या जमावाने दगडफेक सुरू केली, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि हवेत गोळीबार करावा लागला. जिल्हा प्रशासनाने सहकार्य आवाहन केले आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSoldierसैनिकDeathमृत्यूstone peltingदगडफेक