क्षुल्लक कारणावरून हाणामारी

By Admin | Updated: February 8, 2016 00:24 IST2016-02-08T00:24:01+5:302016-02-08T00:24:01+5:30

अकोला : कौलखेड स्थित स्टेट बँक ऑफ इंडिया परिसरात क्षुल्लक कारणावरून एका युवकाला रविवारी फायटरने मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Clash of rage | क्षुल्लक कारणावरून हाणामारी

क्षुल्लक कारणावरून हाणामारी

ोला : कौलखेड स्थित स्टेट बँक ऑफ इंडिया परिसरात क्षुल्लक कारणावरून एका युवकाला रविवारी फायटरने मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कौलखेड स्थित म्हाडा कॉलनी परिसरातील रहिवासी मनोज वरोडकार (२८) हा युवक रविवारी त्याच्या मित्रासोबत स्टेट बँक ऑफ इंडियासमोर उभा होता. दरम्यान, डाबकी रोड रहिवासी शुभम कानकिरड हा एम.एच.०४ डी.के. ३१७१ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने जात असताना अचानक गाडी थांबविली आणि क्षुल्लक कारणावरून मनोजसोबत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत मनोजच्या डोक्यावर फायटरने वार करून त्याला जखमी करण्यात आले. याप्रकरणी मनोज वरोडकार याने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी शुभम कानकिरडविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Clash of rage