कांकेरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ३ माओवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 12:55 PM2024-02-25T12:55:39+5:302024-02-25T12:59:47+5:30

Police Naxalite Encounter In Kanker: छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये ३ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच दोन हत्यारेही सुरक्षा दलांच्या हाती लागली आहेत. 

Clash between police and Naxalites in Kanker, 3 Maoists killed | कांकेरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ३ माओवादी ठार

कांकेरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ३ माओवादी ठार

रायपूर - छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये ३ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच दोन हत्यारेही सुरक्षा दलांच्या हाती लागली आहेत. 
वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोलीस आणि डीआरजीच्या पथकाने शोधमोहीम चालवली होती. कोयलीबेडाच्या दक्षिण भागामध्ये ही चकमक झाली. आताही जंगलांमध्ये शोधमोहीम सुरू आहे. कांकेरचे एसपी आय. के. एलेसेला यांनी या चकमकीच्या घटनेला दुजोरा दिला. आहे.  जिल्हा राखीव गार्ड आणि सीमा सुरक्षा दलाच्या नेतृत्वाखाली नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान कोयालीबेडा येथील जंगल परिसरात ही चकमक झाली. 

Web Title: Clash between police and Naxalites in Kanker, 3 Maoists killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.