बंद घरात चोरट्याचा डल्ला; ५२ हजाराची रोकड लांबविली
By Admin | Updated: November 14, 2015 00:07 IST2015-11-14T00:07:57+5:302015-11-14T00:07:57+5:30
जळगाव: शिवाजी नगरातील इंद्रप्रस्थ नगरात अजय ईश्वर घेंगट (वय ३२) यांच्या बंद घरातून ५२ हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घेंगट हे अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी आहेत. गुरुवारी ते दुपारी पत्नीला माहेरी रावेरला सोडण्यासाठी गेले होते. तेथून शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता घरी परत आले असता घराच्या दरवाजाच्या कुलूप तोडल्यासारखे जाणवले तर घरातील कपाटातून ५२ हजार रुपये रोख चोरी झाल्याचे लक्षात आले. कपाटाचे कुलूप हे बनावट चाबीने उघडण्यात आल्याचा संशय आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वासुदेव सोनवणे करीत आहेत.

बंद घरात चोरट्याचा डल्ला; ५२ हजाराची रोकड लांबविली
ज गाव: शिवाजी नगरातील इंद्रप्रस्थ नगरात अजय ईश्वर घेंगट (वय ३२) यांच्या बंद घरातून ५२ हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घेंगट हे अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी आहेत. गुरुवारी ते दुपारी पत्नीला माहेरी रावेरला सोडण्यासाठी गेले होते. तेथून शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता घरी परत आले असता घराच्या दरवाजाच्या कुलूप तोडल्यासारखे जाणवले तर घरातील कपाटातून ५२ हजार रुपये रोख चोरी झाल्याचे लक्षात आले. कपाटाचे कुलूप हे बनावट चाबीने उघडण्यात आल्याचा संशय आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वासुदेव सोनवणे करीत आहेत.