तरुण गोगाई यांच्याविरोधात मानहानीचा दावा

By Admin | Updated: December 22, 2015 21:11 IST2015-12-22T21:11:13+5:302015-12-22T21:11:13+5:30

आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगाई यांच्याविरोधात भाजपचे नेते आणि माजी मंत्री हिमंता विश्वा शर्मा यांनी १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे पत्रकार परिषदेत मंगळवारी सांगितले.

Claims defamation against Tarun Gogoi | तरुण गोगाई यांच्याविरोधात मानहानीचा दावा

तरुण गोगाई यांच्याविरोधात मानहानीचा दावा

>ऑनलाइन लोकमत
गुवाहटी, दि. २२ - आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगाई यांच्याविरोधात भाजपचे नेते आणि माजी मंत्री हिमंता विश्वा शर्मा यांनी १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे एका पत्रकार परिषदेत मंगळवारी सांगितले.
मुख्यमंत्री तरुण गोगाई यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. त्यांनी शारदा घोटाऴा, लुईस बर्गर लाच प्रकरणाशी माझा संबंध जोडला असून काही दिवसापूर्वी मीडियाशी बोलतांना त्यांनी माझ्यावर अनेक गुन्हे प्रलंबित आहेत, असे सांगितले असल्याचे हिमंता विश्वा शर्मा म्हणाले. त्यामुळे माझ्यावर अशा प्रकारचे आरोप होत असताना मी शांत राहणे योग्य नाही, म्हणून मी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याचा निर्यण घेतला असल्याचे हिमंता विश्वा शर्मा यांनी यावेळी सांगितले. 
हिमंता विश्वा शर्मा हे एकेकाळचे मुख्यमंत्री तरुण गोगाई यांचे जवळचे सहकारी होते. 

Web Title: Claims defamation against Tarun Gogoi