26/11 हल्ल्याच्या सूत्रधारांविरुद्ध दावा
By Admin | Updated: November 12, 2014 02:38 IST2014-11-12T02:38:02+5:302014-11-12T02:38:02+5:30
पाकिस्तानातून सूत्रे हलविलेल्या आरोपींकडून 688 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी अमेरिकेच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे.

26/11 हल्ल्याच्या सूत्रधारांविरुद्ध दावा
वॉशिंग्टन : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार वा जखमी झालेल्या नऊ अमेरिकी आणि एका इस्नएली नागरिकाच्या वारसदारांनी हल्ल्याची पाकिस्तानातून सूत्रे हलविलेल्या आरोपींकडून 688 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी अमेरिकेच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे. या आरोपींत जमात उद दवाचा प्रमुख हफीज सईद याचाही समावेश आहे.
न्यूयॉर्क न्यायालयात हा दावा 3क् व 31 ऑक्टोबर रोजी पुन्हा दाखल केला. या खटल्याची सुनावणी ज्युरी पद्धतीने व्हावी तसेच लष्कर ए तोयबा आणि जमात उद दवाचा प्रमुख हफीज सईद, लष्कर ए तोयबाता कमांडर झकी उर रहमान लखवी , साजिद माजीद आणि आझम चिमा यांच्यासह मेजर इकबाल व मेजर समीर अली या दोन पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध त्यांच्या अनुपस्थितीत दावा चालवून निकाल केला जावा, अशी विनंतीही या दाव्यात नव्याने करण्यात आलेल्या अर्जामध्ये केली गेली आहे. न्यूयॉर्कच्या पूर्व जिल्हा न्यायालयात हा मूळ दावा 2क्1क् मध्ये दाखल केला होता. (वृत्तसंस्था)