शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एन. व्ही. रमण होणार नवे सरन्यायाधीश; न्या. बोबडे यांनी केली केंद्राला शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 12:28 IST

supreme court chief justice: सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी एका नावाची शिफारस करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

ठळक मुद्देनव्या सरन्यायाधीशांची केंद्राला शिफारससरन्यायायाधीश शरद बोबडे यांनी सूचवले नावएन. व्ही. रमण होणार नवे सरन्यायाधीश

नवी दिल्ली : सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून, त्यांच्या जागी कोण नवे सरन्यायाधीश असतील, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, न्या. शरद बोबडे यांनी एका नावाची शिफारस करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. बोबडे यांनी न्या. एन. व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. (cji sharad bobde recommends justice nv ramana as supreme court chief justice to center government)

सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल पुढील महिन्यात  म्हणजेच २३ एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. काही दिवसांपूर्वीच सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केंद्र सरकारने केली होती. केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात पत्र पाठवले होते. 

रमण यांच्या नावाची केंद्राला शिफारस

न्या. शरद बोबडे यांच्यानंतर एन.व्ही. रमण हे सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वांत जास्त अनुभव असलेल्या न्यायमूर्तींची नियुक्ती केली जाते. 

कोण आहेत एन. व्ही. रमण

रमण यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. ते ६४ वर्षांचे आहेत. १० फेब्रुवारी १९८३ पासून आपल्याला वकिलीला सुरुवात केली. न्यायमूर्ती रमण यांनी यांचं बी.एस्सी, बी.एल. शिक्षण झालेलं असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेले आहे.

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

दरम्यान, १८ नोव्हेंबर २०१९ ला सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली होती. ते भारताचे ४७ वे सरन्यायाधीश ठरले होते. न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाचा मान महाराष्ट्राला तिसऱ्यांदा मिळाला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय