लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सेवानिवृत्तीनंतर कोणतेही शासकीय पद घेणार नाही. परंतु विधी क्षेत्रातील कार्य सुरूच राहील, असे मावळते सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
१८ जानेवारी २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती झालेले न्या. खन्ना यांनी ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली. ते मंगळवारी सेवानिवृत्त झाले.
न्या. भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
देशाचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून भूषण रामकृष्ण गवई हे बुधवारी पदभार स्वीकारणार आहेत. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून गवई यांच्या नावाची शिफारस केली होती. न्या. गवई हे माझे सर्वांत मोठे सहकारी असल्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी स्पष्ट केले.