शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : निर्भया प्रकरणाच्या सुनावणीतून सरन्यायाधीश झाले बाजूला, पुनर्विचार याचिकेवर उद्या होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 16:27 IST

Nirbhaya Case : या याचिकेवरील सुनावणी बुधवारी होणार आहे. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीसाठी नवे घटनापीठ बुधवारी सकाळीच स्थापन केले जाईल.

नवी दिल्ली -  सात वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील  सुनावणी आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. आता या याचिकेवरील सुनावणी बुधवारी होणार आहे. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीसाठी नवे घटनापीठ बुधवारी सकाळीच स्थापन केले जाईल. तसेच सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या पुतण्याने निर्भयाच्या बाजूने युक्तिवाद केला असल्याने सरन्यायाधीश शरद बोबडे हे या सुनावणीपासून वेगळे झाले आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील सहा आरोपींपैकी चार आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. पैकी अक्षय ठाकूर या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात दयेची याचिका दाखल केली आहे. दरम्यान या सुनावणीवेळी निर्भयाचे पालकसुद्धा न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, दोषीच्या वकिलाला युक्तिवादासाठी  ३०  मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. यावेळी दोषींच्या वकिलाने आपल्या अशिलाविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचा दावा करत सगळा दोष प्रसारमाध्यमांच्या माथी मारला. प्रसारमाध्यमांनीच आपल्या अशिलाविरोधात अपप्रचार केला. असा आरोप त्यांनी केला. 

दरम्यान, निर्भायाच्याआईने बलात्कार प्रकरणातील आरोपीने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेला विरोध दर्शवला होता. दोषीने फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला विलंब व्हावा म्हणून पुनर्विचार याचिका दाखल केली आहे, असा आरोप निर्भयाच्या आईने आपल्या याचिकेमधून केला आहे. दोषींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी निर्भयाच्या आईने केली आहे. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपSupreme Courtसर्वोच्च न्यायालय