शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:52 IST

CJI BR Gawai Attacked, Adv. Rakesh Kishor: परमात्म्याने माझ्या हातून ते करवून घेतलं..- वकिल राकेश किशोर

CJI BR Gawai Attacked, Adv. Rakesh Kishor: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांच्यावर हल्ला करणारे वकील राकेश किशोर यांना समज देऊन सोडून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी केलेली कृती आणि त्यानंतर घडलेल्या घटना याबद्दल अनेक तपशील शेअर केले. वकील डॉ. राकेश किशोर म्हणाले की, परमात्म्याने मला जे करण्यास सांगितले तेच मी केले. खजुराहोमधील भगवान विष्णूच्या मूर्तीबाबतच्या याचिकेबाबत १६ सप्टेंबर रोजी सरन्यायाधीश गवई यांनी केलेल्या टिप्पण्यांमुळे मी दुखावले होते. त्यामुळे परत्म्याने माझ्याकडून तसे घडवून घेतले, असे राकेश किशोर टीव्हीनाइनशी बोलताना म्हणाले.

हा त्यांचा चांगुलपणा की त्यामागे काही रहस्य...

बीआर गवई यांच्यावर हल्ला केल्यानंतर राकेश कुमार यांना काही तासांसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मी जेव्हा कृती केली, तेव्हा असा विचार करून गेलो होतो की माझ्यासोबत जे घडायचे आहे ते घडू दे, देवाची इच्छा असेल ते माझ्यासोबत होईल, मी काहीही करू शकत नाही. पण मला सोडून देण्यात आले. मलाही समजत नाहीये की हा सरन्यायाधीशांचा दयाळूपणा आहे, त्यांचा चांगुलपणा आहे की यामागे काही वेगळंच रहस्य आहे.

बार कौन्सिलने रद्दल केले सदस्यत्व

बी.आर. गवई यांनी वकिलाविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केली नाही. उलट, त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा देऊन त्यांना जाऊ देण्यास सांगितले. त्यानंतर बार कौन्सिलने कारवाई केली आणि त्यांचे सदस्यत्व रद्द केले. बार कौन्सिल ऑफ इंडियाने केलेल्या कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले की, मला काल संध्याकाळी पत्र मिळाले. हा हुकूमशाही, तुघलकी निर्णय आहे. १९६१ च्या वकिलांच्या कायद्याचे कलम ३५ मध्ये स्पष्टपणे सांगते की जर कोणत्याही वकिलाकडून कोणतीही बाब तुमच्याकडे आली किंवा तुम्ही स्वतःहून दखल घेतली तर तुम्ही एक शिस्तपालन समिती स्थापन करावी आणि कारणे दाखवा नोटीस बजावावी. त्याला त्याच्या कृतींचे स्पष्टीकरण देण्याची संधी दिली पाहिजे. त्यांनी हे सर्व न करता निलंबनाची कारवाई केली आणि तुघलकी हुकूम जारी केला.

अनेक वकील माझ्या पाठिशी- राकेश किशोर

जेव्हा राकेश यांना विचारण्यात आले की या कृत्यानंतर वकील त्याच्या विरोधात गेले आहेत का, तेव्हा ते म्हणाले की सर्व वकील माझ्या विरोधात नाहीत. मला अनेक वकिलांचे फोन आणि मेसेज येत आहेत. मला इतर पक्षांचेही फोन येत आहेत. मी कुणाच्याही धर्माबद्दल काय बोललो नाही, कोणते अपमानजनक शब्द वापरले नाहीत. मी इथेच बसलो आहे.ृ

English
हिंदी सारांश
Web Title : Lawyer attacks Chief Justice, released; claims divine intervention, mystery.

Web Summary : Advocate Rakesh Kishor, who attacked CJI Gavai, was released and claims he acted on divine orders due to hurt feelings. He questions the leniency, suggesting a hidden reason. The Bar Council revoked his membership, which he calls dictatorial, while some lawyers support him.
टॅग्स :CJI BR GavaiCJI भूषण रामकृष्ण गवईadvocateवकिल