शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Pulwama Attack: पुन्हा 'ती' चूक नाही होणार; पुलवामासारखा अनर्थ टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 18:15 IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानं देश हादरला आहे. सीआरपीएफच्या 38 जवानांना अवंतीपुरामध्ये वीरमरण आल्यानं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा संताप आणखी वाढला. पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली.  मात्र त्याचवेळी, गुप्तचर यंत्रणेकडून 'हाय अ‍ॅलर्ट' जारी करण्यात आला असतानाही, सुरक्षा यंत्रणा इतकी गाफील का आणि कशी राहिली?, अशी शंका अनेकांच्या मनात आहे. अडीच हजार जवानांचा ताफा येत असताना यंत्रणा सतर्क का नव्हती?, स्फोटकांनी भरलेली गाडी या रस्त्यावर आलीच कशी?, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानुसार, सीआरपीएफचा ताफा ज्या रस्त्याने जाणार होता, तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका भागातून स्थानिकांच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देणं घातक ठरलं, अशी माहिती सीआरपीएफचे महानिरीक्षक (ऑपरेशन्स) कश्मीर जुल्फिकार हसन यांनी दिली. अडीच हजार जवानांचा ताफा जाण्यासाठी बराच वेळ लागणार होता. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून ही परवानगी देण्यात आली होती. मात्र हीच चूक सीआरपीएफच्या जवानांच्या जीवावर बेतली. त्यामुळे आता ही चूक सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याबद्दलची माहिती दिली. 'काल सीआरपीएच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला. त्यामुळे यापुढे जेव्हा सुरक्षा दलांचा मोठा ताफा जाईल, त्यावेळी त्या रस्त्यावरील इतर वाहनांची वाहतूक रोखण्यात येईल. यामुळे स्थानिकांना थोडा त्रास होईल. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत,' असं राजनाथ सिंह म्हणाले. हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना अधिकाधिक मदत करण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारांकडे करण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. सीआरपीएफच्या जवानांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम झालेला नाही. दहशतवादाविरोधातील कारवाई शेवटपर्यंत सुरुच राहील, असं राजनाथ यांनी स्पष्ट केलं. सीआरपीएफचा ताफा जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन जात असताना एका भागातून स्थानिकांच्या वाहनांना वाहतुकीसाठी देण्यात आलेली परवानगी जवानांच्या जीवावर बेतली. ताफा जाण्याआधी रोड ओपनिंग पार्टीनं गुरुवारी सकाळी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली होती. या मार्गावर कुठेही स्फोटकं सापडली नव्हती. तसंच, जवानांच्या ताफ्यावर गोळीबार होऊ नये, हँड ग्रेनेड फेकली जाऊ नयेत, यादृष्टीनंही पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. परंतु, काश्मिरी नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून महामार्गाच्या एका भागातून त्यांच्या गाड्या नेण्यास संमती देण्यात आली होती. मात्र याचा गैरफायदा घेत जैश-ए-मोहम्मदचा आत्मघाती दहशतवादी आदिल अहमद सर्व्हिस रोडवरून राजमार्गावर आला आणि अघटित घडलं. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश ए मोहम्मद