सिव्हील लाईन्स - सुधारित

By Admin | Updated: June 6, 2015 00:11 IST2015-06-06T00:11:10+5:302015-06-06T00:11:10+5:30

सिव्हिल लाईन विभाग पुन्हा एसएनडीएलच्या हाती

Civil Lines - Improved | सिव्हील लाईन्स - सुधारित

सिव्हील लाईन्स - सुधारित

व्हिल लाईन विभाग पुन्हा एसएनडीएलच्या हाती
तात्पुरते हस्तांतरण : चौकशी अहवालानंतरच अंतिम निर्णय
नागपूर :
महावितरणने बरोबर महिन्याभरानंतर सिव्हील लाईन्स विभागाला पुन्हा आपल्या फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या स्वाधीन केले आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजता एसएनडीएलने पुन्हा एकदा कामकाज सांभाळले आहे. परंतु हे हस्तांतरण सुद्धा तात्पुरती व्यवस्था आहे. एसएनडीएलच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवाल आल्यावर त्या आधारावरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे ५ मे रोजी रात्री १२ वाजता महावितरणने सिव्हील लाईन्स विभागाचा कारभार आपल्या हाती घेतला होता. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सिव्हील लाईन्स विभागाचे काम पूर्णपणे प्रभावित झाले असल्याचे कारण पुढे करीत महावितरणने ही कारवाई केली होती. ते हस्तांतरण सुद्धा तात्पुरती व्यवस्था असल्याचे महावितरणने म्हटले होते. परंतु कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतरही महावितरणने सिव्हील लाईन्स विभाग एसएनडीएलकडे सोपविला नव्हता.
दरम्यान शुक्रवारी दुपारी २ वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिव्हील लाईन्स विभाग एसएनडीएलकडे पुन्हा सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. सूत्रांचे म्हणणे आहे की, या निर्णयामागे एसएनडीएलच्या विरुद्ध स्थापन करण्यात आलेली चौकशी समिती एक मुख्य कारण आहे. समितीचा अहवाल १५ दिवसात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विभाग एसएनडीएलला परत करण्यात यावा आणि चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारावर पुढची कारवाई केली जावी, असे ठरविण्यात आले.
बॉक्स
फ्रेन्चाईजीने मानले आभार
वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने या निर्णयासाठी महावितरणचे आभार मानले आहे. कंपनी ग्राहकांना गुणवत्तेसह वीज पुरवठा प्रदान करेल. ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा प्रदान करण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचा दावाही एसएनडीएलने केला आहे.

Web Title: Civil Lines - Improved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.