शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

फक्त दूध नव्हे तर शेण विकून झाला करोडपती; इंजिनिअर बनला उद्योगपती; आता कोट्यवधींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 12:02 IST

तरुणाने नोकरी सोडून या कामात स्वत:ला वाहून घेतले. आज तो या व्यवसायातून भरपूर नफा कमावत आहे.

व्यवसाय करण्याची इच्छा आणि आवड असेल तर कोणताही व्यवसाय छोटा नसतो. एखादा छोटासा व्यवसाय करूनही मेहनतीने कोट्यवधींचं साम्राज्य उभारता येतं. व्यवसायातील यश पाहून अनेक सुशिक्षित तरुण त्यात नशीब आजमावत आहेत. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. ज्याने नोकरी सोडल्यानंतर आपल्या मनाचं ऐकलं आणि आज एक मोठा व्यापारी बनला. 26 वर्षीय जयगुरु आचार हिंडर हा एका खासगी कंपनीत सिव्हिल इंजिनियर होता. मात्र नंतर त्याने शेण आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला. 

तरुणाने नोकरी सोडून या कामात स्वत:ला वाहून घेतले. आज तो या व्यवसायातून भरपूर नफा कमावत आहे. जयगुरु आचार हिंडर हा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यातील मुंडुरू गावचा रहिवासी आहे. त्यांनी विवेकानंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, पुत्तूर येथून इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली. त्यानंतर 22000 रुपये पगारावर खासगी कंपनीत कामाला सुरुवात केली. पण हे काम त्याला आवडले नाही. रोजच्या कामाचा कंटाळा येऊ लागला. नोकरीत रस नसल्याने त्याने 2019 मध्ये नोकरी सोडली.

तरुणाला शेतीची आवड होती. त्याने वडिलांसोबत शेतीची कामे करण्यास सुरुवात केली. त्याच्या घरी 10 गायी होत्या, ज्यांच्यासोबत तो वेळ घालवत असे. त्याने उत्पन्न वाढवण्याचे अनेक मार्ग शोधले. इंटरनेटवर अनेक व्हिडीओ पाहून हिंडरने पटियालाला जाण्याचा निर्णय घेतला. शेतीसोबतच दुग्धव्यवसाय सुरू केला आणि हळूहळू त्यांच्या डेअरीत 130 गायी वाढवल्या. त्यानंतर काही काळानंतर त्याने डेअरी वाढवण्यासाठी 10 एकर जमीनही विकत घेतली. यानंतर त्याच्या मनात एक कल्पना आली आणि त्याने एक मशीन विकत घेतली. हे यंत्र गायीचे शेण सुकवते.

हिंडर आता दर महिन्याला 100 पोती शेण विकतो आणि त्यातून भरपूर कमाई करतो. यामध्ये गायींचे शेण, गोमूत्र आणि गायींना आंघोळ घातल्यावर मिळणारे सांडपाणी यांचा समावेश आहे. हिंडर दररोज 750 लीटर दूध आणि दरमहा 30-40 लीटर तूप विकतो. 10 एकरात पसरलेल्या त्याच्या फार्महाऊसमध्ये तो हा व्यवसाय करतात. यातून तो दरमहा 10 लाख रुपये कमावतो. आणि आता तो दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी युनिट स्थापन करण्याच्या तयारीत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी