शहर सिंगल क्राई बातम्या...
By Admin | Updated: August 28, 2015 00:30 IST2015-08-28T00:30:32+5:302015-08-28T00:30:32+5:30
विवाहित महिलेचा छळ ; पाच जणांवर गुन्हा

शहर सिंगल क्राई बातम्या...
व वाहित महिलेचा छळ ; पाच जणांवर गुन्हा सोलापूर : विवाहित महिलेस घटस्फोट दे म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती नंदकिशोर बोद्धूल, मीनाबाई बोद्धूल, चनप्पा बोद्धूल, प्रशांत बोद्धूल, सारिका बाल्लू (सर्व रा. ७५ विडी घरकुल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपींनी विवाहित महिला रेश्मा नंदकिशोर बोद्धूल (वय ३0) हिचा छळ केला व पती नंदकिशोर बोद्धूल याचा विवाह प्रिया द्यावरशेी हिच्याबरोबर लावून दिला. तपास पो.हे.कॉ. घुगे करीत आहेत. खरेदी करताना ३८ हजारांची बँक लंपास सोलापूर : मंगळवार पोलीस चौकीसमोर पुष्पा प्रभाकर देशमुख (वय ४६ रा. ४२११, बुधवार पेठ) कपड्याच्या दुकानात खरेदी करीत असताना ३८ हजार ८१0 रूपये असलेली हातातील बॅग क्यावर ठेवली असता ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार बुधवारी दुपारी ३.२२ वा. घडला. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी सोलापूर : विवेकानंद नगर भाग-२ येथील राहत्या घरी बेडरूममध्ये उघड्या लाकडी कपाटावर ठेवलेले २ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी गणेश विष्णू सुरवसे (रा. विवेकानंद नगर भाग-२) याच्या विरूद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी सायंकाळी ७.५0 वा. हा प्रकार घडला. आशा चंद्रकांत शिंदे (वय ६१) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास महिला सपोनि देवकते करीत आहेत.