शहर सिंगल क्राईम बातम्या..(पानावर लागलेल्या आहेत)

By Admin | Updated: August 29, 2015 01:05 IST2015-08-29T01:05:16+5:302015-08-29T01:05:16+5:30

सराफ बाजारात महिलेची पर्स पळवली

City Single Crime News .. (on page | शहर सिंगल क्राईम बातम्या..(पानावर लागलेल्या आहेत)

शहर सिंगल क्राईम बातम्या..(पानावर लागलेल्या आहेत)

ाफ बाजारात महिलेची पर्स पळवली
सोलापूर : मंगळसूत्र गाठण्याकरिता सराफ बाजारात गेलेल्या विमल विद्याधर जगताप (वय 58, रा. 13- आंबेडकर सोसायटी) यांची 19 हजार 220 रूपये ऐवज असेलली पर्स अज्ञात चोरट्याने पळवून नेली. ही चोरी गुरूवारी रात्री 9 वा. झाली. विमल जगताप या सोहम ज्वेलर्समधून इतर दुकानात खरेदीसाठी गेल्या असता अज्ञात चोरट्याने लक्ष ठेवून ही चोरी केली. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो.हे.कॉ. शेख करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षाचे नुकसान
सोलापूर : नवीन तुळजापूर नाका येथे थांबलेल्या रिक्षा (क्र. एम.एच.13 बी.व्ही.602) ला अज्ञात वाहनाने धडक देऊन 1 लाख 60 हजारांचे नुकसान केले. अनंत शिवाजी साठे (वय 30, रा. बुधवार पेठ) हा रिक्षा लावून थांबला असता हा अपघात घडला. या प्रकरणी अज्ञात वाहनाविरूद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैशाच्या कारणावरून बहिणीस मारहाण
सोलापूर : दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून बहिणीस शिवीगाळ करून लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी बाबुराव धोंडिबा शिंदे (रा. भाटेवाडी डोणगाव रोड) याच्या विरूद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत बहीण सुशीला धोंडिबा शिंदे (वय 35) या जखमी झाल्या आहेत.
असुरक्षित जनावरांची वाहतूक
सोलापूर : राहुल गांधी झोपडप?ी येथून वाहनातून असुरक्षितपणे एक गाय व दोन वासरूची वाहतूक केल्याप्रकरणी वाहनचालक सैपन शकुर कुरेशी (रा. 287, बेगमपेठ) याच्या विरूद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो वाहन (क्र. एम.एच.13 ए.एन.7594) मधून जनावरे घेऊन जात होता. हा प्रकार दि.27 ऑगस्ट रोजी सकाळी 11.20 वा. घडला.
खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
सोलापूर : 50 हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी नागेश शिवाजी महानूर (रा.क्रांतीनगर) याच्या विरूद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: City Single Crime News .. (on page