शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

'नागरिकत्व सुधारणा कायदा' मुस्लीमविरोधी नाही, आठवलेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 13:47 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

गोरखपूर - नागरिकत्व सुधारणा कायद्याला काँग्रेससह देशातील आणखी काही पक्षांनी विरोध केला आहे. तर, आसाममधील विद्यार्थ्यांनीही या कायद्याला विरोध करत हा धार्मिक भेदभाव निर्माण करणारा कायदा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या कायद्यावरुन देशात संभ्रमाचे वातावरण विरोधकांकडून पसरवलं जात आहे, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनीही या कायद्याचं समर्थन केलं आहे.  नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर, सर्वोच्च न्यायालयानं नागरिकत्व सुधारणा कायद्यावर प्रतिबंध घालण्यास नकार दिला आहे. पण, हा कायदा संविधानानुसार लागू करता होऊ शकतो की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय 22 जानेवारीला सुनावणी घेणार आहे. सध्या, या कायद्याला विरोध करत देशातील वातावरण गंभीर झालं आहे. दिल्लीसह अनेक राज्यांत जोरदार विरोध प्रदर्शन सुरू झालं आहे. मंगळवारी दिल्लीतील जामिया, सराया जुलैना भागात आंदोलन केलं आहे. आंदोलकांनी दोन बससह अनेक वाहनांची तोडफो केली आहे. या घटनेत 12 पोलीस कर्मचाऱ्यासंह 22 जण जखमी झाले आहेत. नव्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आसामसह ईशान्य भारतातील इतर राज्यांत पेटलेल्या आंदोलनाची धग कायम आहे. गुवाहाटीमध्ये संचारबंदीला न जुमानता लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. मात्र, हा कायदा मुस्लीमविरोधी नसल्याचे रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.देशातील नागरिकांनी या कायद्यामुळे भयभीत होण्याचं कारण नाही. नागरिकत्व सुधारणा कायदा हा मुस्लिमांविरुद्ध नाही, असे आठवलेंनी म्हटले. भारतात राहणाऱ्या मुस्लीम नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, हा कायदा शेजारील देशांमधून शरणार्थी म्हणून भारतात आलेल्या हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारसी आणि ईसाई लोकांना नागरिकता देण्यासंदर्भात आहे. कुणावरही अन्याय होईल, असा हा कायदा नाही. घुसकोरी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार हा कायदा आहे, असेही आठवेंनी स्पष्ट केलंय. गोरखपूरच्या कुशीनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना आठवलेंनी या कायद्यासंदर्भात भाष्य केलं. 

दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या या दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे कायद्यात रूपांतर झालेल्या कायद्याविरोधात आंदोलनाने सर्वात रौद्र रूप आसाममध्ये धारण केले होते. तिथे निदर्शनांमुळे सर्व रस्ते बंद करण्यात आल्यानं काही रेल्वे स्थानके व विमानतळावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhiदिल्लीBJPभाजपाMuslimमुस्लीम