शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Citizenship Amendment Bill: हा कायदा देशाची फाळणी करणारा; ओवेसींनी लोकसभेत फाडली विधेयकाची प्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 22:54 IST

असदुद्दीन ओवेसींनी विधेयकाची प्रत फाडताच सभागृहात मोठा गदारोळ

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी विधेयकाची प्रत फाडली. यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेच्या हंगामी अध्यक्षा रमा देवी यांनी ओवेसींना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले. आम्ही जिन्नांची विचारसरणी नाकारुन मौलाना आझादांच्या तत्त्वांचा पुरस्कार करुन वाटचाल केली. आपले आणि हिंदुस्तानचे 1000 वर्षांपासूनचे संबंध असल्याचे आझाद म्हणाले होते. मग आताच्या सरकारला मुस्लिमांची इतकी अडचण का होते, असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून देशाच्या विभाजनाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारनं आणलेलं विधेयक घटनेच्या गाभ्याविरोधात आहे. हे विधेयक आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणारं आहे. देशाची फाळणी करणारं हे विधेयक मी फाडून टाकतो, असं ओवेसी म्हणाले. आपण या विधेयकाला विरोध करत असल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.  राजेंद्र प्रसाद यांनी संविधानाच्या प्रस्तावनेत कोणत्याही धर्माच्या देवतेचं नाव लिहिण्यास विरोध केला होता, असं ओवेसी म्हणाले. आम्ही मुस्लिम आहोत, हाच आमचा गुन्हा आहे का? तुम्ही मुस्लिमांना निर्वासित करत आहात. हे विधेयक देशाला आणखी एका फाळणीकडे घेऊन जाईल. हा कायदा हिटलरच्या कायद्यापेक्षा वाईट असेल, अशा शब्दांत ओवेसींनी नागरिकत्व सुधारणा विधेयकावर सडकून टीका केली. आज दुपारीदेखील विधेयकावरील चर्चेदरम्यान ओवेसींनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. 'देशाला आणि गृहमंत्र्यांना लोकसभा अध्यक्षांनी वाचवावं. अन्यथा नुरेमबर्ग कायदा आणि इस्रायलच्या नागरिकत्व कायद्यावेळी जो प्रकार घडला, तोच भविष्यात घडेल आणि हिटलर आणि बेन गुरियन यांच्याप्रमाणेच गृहमंत्र्यांचं नाव इतिहासात नोंदलं जाईल,' अशा शब्दांत ओवेसींनी शहांवर सडकून टीका केली. इस्रायलमध्ये संरक्षण मंत्र्यांचं नाव हिटलरशी जोडलं जातं, असं म्हणत ओवेसींनी डेव्हिड बेन-गुरियन यांचा संदर्भ दिला. बेन गुरियन इस्रायलचे पहिले पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री होते. नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावरुन ओवेसींनी मोदी सरकारवर आधीपासूनच कडाडून टीका केली आहे. नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक संमत झाल्यास भारताचा इस्रायल होईल आणि नागरिकांमध्ये धर्माच्या नावावरुन भेदभाव केला जाईल, असा इशारादेखील त्यांनी दिला. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAmit Shahअमित शहाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा