CAA Protests Live: नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, उत्तर प्रदेशात पाच जणांचा मृत्यू

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 07:49 AM2019-12-20T07:49:55+5:302019-12-20T19:31:41+5:30

नवी दिल्लीः दिल्ली पोलिसांसाठी शुक्रवारचा दिवस आव्हानात्मक आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतली परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यातच ...

Citizenship Amendment Act protests Updates: CAA protest on friday police and intelligence is on alert | CAA Protests Live: नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, उत्तर प्रदेशात पाच जणांचा मृत्यू

CAA Protests Live: नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, उत्तर प्रदेशात पाच जणांचा मृत्यू

Next

नवी दिल्लीः दिल्ली पोलिसांसाठी शुक्रवारचा दिवस आव्हानात्मक आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतली परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यातच नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी जामा मशीदबाहेर निदर्शने करण्यात येत आहे. मंडल आयोगाच्या विरोध प्रदर्शनानंतर दिल्लीतलं हे सर्वात मोठं आंदोलन असण्याची शक्यता आहे. दिल्लीतल्या विविध भागातून 40हून अधिक मोर्चे निघू शकतात. विशेष म्हणजे इंडियन मुझाहिद्दीन आणि सिमीशी संबंधित कट्टरवादीही या आंदोलनात सहभागी झाले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. 

LIVE

Get Latest Updates

10:13 PM

जोपर्यंत हा काळा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांचा इशारा

10:12 PM

दिल्ली दर्यागंज परिसरात शिघ्र कृती दलाच्या जवानांचा फ्लॅग मार्च

07:27 PM

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारात ऊत्तर प्रदेशात पाच आंदोलकांचा मृत्यू

06:55 PM

दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात सेंट्रल पार्क येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ नागरिकांचे आंदोलन

06:15 PM

नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील इंडिया गेट येथे आंदोलन

05:41 PM

नागरिकत्व कायद्याविरोधात राज्यात तीव्र निदर्शने

05:21 PM

CAB एवढंच चांगलं असेल तर हे विधेयक मंजूर करताना मोदींनी मतदान का नाही केले? ममतांचा सवाल

05:05 PM

बीडमधील बशीरगंज भागातील गर्दी निवळली

बीड : बशीरगंज भागातील गर्दी निवळली, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी उपस्थित

04:49 PM

मेरठमध्ये नागरिकत्व विधेयकाला विरोध करणाऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक

04:48 PM

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जळगाव मुस्लिम मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

जळगाव - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात  जळगाव मुस्लिम मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

04:47 PM

अंबरनाथमध्ये हजारो मुस्लिम बांधवांचा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला कडाडून विरोध

अंबरनाथ: मुस्लिम जमात यांच्यावतीने आज अंबरनाथ मध्ये निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात अंबरनाथ मधील हजारो मुस्लिम बांधव एकत्रित आले होते. शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर कोसगाव येथील दर्ग्या पासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. दुपारी अडीच वाजता हा मोर्चा तहसील कार्यालयाकडे निघाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चाच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर तहसील कार्यालयाला चोख बंदोबस्त देण्यात आले होते. तहसील कार्यालयात मोर्चा आल्यावर मोठमोठ्याने घोषणाबाजी करण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करू नये अशी विनंती मोर्चेकरयांना केली. मात्र त्याला त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. कोणताही अनुचित प्रकार न घडता हा मोर्चा शांततेत पार पडला.

04:46 PM

बीडमध्ये दोन बसेसवर दगडफेक, अश्रूधुराच्या नलकांड्या फोडून जमाव पांगविण्याचा प्रयत्न

बीडमध्ये दोन बसेसवर दगडफेक, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न

10:35 AM

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोधच, पण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार नाही- मायावती

नागरिकत्व सुधारणा कायद्याला मी नेहमीच विरोध केला आहे. त्याविरोधात आंदोलनही केलं आहे. परंतु आम्ही इतरांसारखे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि हिंसाचार करणार नाही- मायावती



 

10:15 AM

समाजवादी पक्षाचे खासदार शफिकुर रहमान बारकसह 17 जणांविरोधात FIR दाखल 



 

08:34 AM

कर्नाटकातील मंगळुरूमधल्या हिंसाचारामुळे आज शाळा-कॉलेज बंद
 

08:32 AM

लखनऊमधल्या हिंसक प्रदर्शनामुळे मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवा 21 डिसेंबरपर्यंत खंडित
 

07:58 AM

 कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या काही भागांत झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू
 

07:52 AM

जामिया आणि जसोला विहार मेट्रो स्टेशन आजही राहणार बंद: DMRC

Web Title: Citizenship Amendment Act protests Updates: CAA protest on friday police and intelligence is on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.