शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अॅट्रॉसिटीच्या विरोधात नागरिक रस्त्यावर; मध्य प्रदेशात दगडफेक, जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 13:34 IST

मध्य प्रदेशातील काही इतर समाजाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून याविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे.

भोपाळ- गेल्या काही दिवसांपूर्वी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) सर्वोच्च न्यायालयानं बदल केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयानं केलेला बदल केंद्र सरकारनं सुधारित एससी-एसटी अॅक्टचं विधेयक मंजूर करून फेटाळून लावला होता. त्यानंतर देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये  केंद्र सरकारविरोधात निदर्शनं केली जात आहेत. सोमवारी मध्य प्रदेशातील काही इतर समाजाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून याविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. उत्तर प्रदेशातल्याही अनेक भागात केंद्र सरकारविरोधात आंदोलनं करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये इतर समाजाच्या लोकांनी विरोध प्रदर्शन करत नाराजी व्यक्त केली होती. मध्य प्रदेशमध्ये येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वीच इतर समाजातील काही लोकांनी अॅट्रॉसिटी विरोधात प्रदर्शन केलं आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासभा आणि क्षत्रिय महासभेनं भाजपाविरोधात खुलं विरोध प्रदर्शन केलं आहे. केंद्र आणि मध्य प्रदेशात दोन्ही ठिकाणी भाजपाचं सरकार आहे. त्यामुळेच केंद्राविरोधात ब्राह्मण महासभेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, त्यांनी भाजपाला मध्य प्रदेश आणि केंद्र सरकारमधून पायउतार करण्याचा संकल्प केला आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीही भाजपाला खुलं आव्हान दिलं आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष अमर सिंह भदौरिया म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात प्रचार करणार असून, लोकांना त्याच्याविरोधात मत देण्याचं आवाहनही करू, एससी-एसटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय केंद्र सरकारनं रद्दबातल ठरवल्यानं सर्वसामान्य वर्गाला याचं मोठं नुकसान सहन करावा लागत आहे.  अखिल भारतीय क्षत्रिय महासभा आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासभा यांनी भाजपाच्या विरोधात इतर राज्यांतही प्रचार करणार असल्याचं जाहीर केलं आहे.  

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाMadhya Pradeshमध्य प्रदेश