शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 06:58 IST

या अहवालानुसार, कोणताही सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवस अगोदर अवैधरीत्या इंटरनेटद्वारे बाजारात येतो...

मुंबई : हिंदीसह स्थानिक भाषांतील सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच त्याच्या पायरेटेड कॉपीज बाजारात येण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले असून २०२३ या एका वर्षात ‘पायरसी’मुळे चित्रपट उद्योगाचे २२ हजार ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. चित्रपट उद्योगाच्या अर्थकारणावर आधारलेल्या ईवाय-आयएएएआय अँटी पायरसी स्टडीज  या अभ्यास अहवालात हे वास्तव समोर आले आहे. बॉलिवूड उद्योगाचे अर्थकारण नाजूक अवस्थेत असताना ‘पायरसी’मुळे त्याला अधिकच फटका बसत असल्याचेही त्यात म्हटले आहे.

या अहवालानुसार, कोणताही सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवस अगोदर अवैधरीत्या इंटरनेटद्वारे बाजारात येतो. त्यामुळे प्रामुख्याने चित्रपट निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात काम करणारे कर्मचारी ‘पायरसी’च्या प्रकरणांत गुंतलेले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अहवालानुसार २०२३ मध्ये चित्रपटांचे १३ हजार ७०० कोटी रुपयांचे, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे ८७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

धक्कादायक म्हणजे, देशातील ५१ टक्के लोक चित्रपटगृह अथवा ‘ओटीटी’चे अधिकृत सबस्क्रिप्शन न घेता पायरेटेड  कॉपीजमधून सिनेमा अथवा मालिका बघत असल्याचे समोर आले आहे. आजच्या घडीला सोशल मीडिया, विविध मोबाइल ॲप आदी माध्यमातून सर्वाधिक पायरसी होत असून, प्रामुख्याने १९ ते ३४ या वयोगटातील लोक सर्वाधिक पायरेटेड कंटेट बघत असल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

‘पायरसी’चा फटका कुणाला?ज्या सिनेमांचे अथवा मालिकांचे बजेट फारसे नाही, अशा निर्मात्यांना या पायरसीचा सर्वाधिक फटका बसतो आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची प्रत बाहेर जाऊ नये म्हणून निर्मात्यांना अधिक सतर्क राहावे लागत आहे. 

कुठे किती अवैध प्रेक्षक? आकडे कोटीत९.३० भारत ४.७५ इंडोनेशिया ३.११ फिलिपाइन्स  १.८२ थायलंड १.६० व्हिएतनाम 

कुठे किती होते पायरसी?६३% अवैध वेबसाइट १६% मोबाइल ॲप्स१०% सोशल मीडिया११% अन्य माध्यमे 

कोणत्या भाषांना सर्वाधिक फटका?    हिंदी     ४० टक्के    इंग्रजी     ३१ टक्के    दाक्षिणात्य     २३ टक्के    अन्य     ६ टक्के

टॅग्स :cinemaसिनेमा